Join us

डाळिंब शेतीसाठी मधमाशी पालन ठरलं फायदेशीर, वाचा काय बदल झाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 9:06 AM

डाळींब पीकात कळी सेट होण्यात मधमाशी मुख्य भूमिका बजावत असतात. म्हणूनच अनेक शेतकरी..

मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर डाळिंब पिकांसाठी देखील मधमाशीपालन उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आले आहे. 

आजकाल स्थित भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी वेगवगेळे प्रयोग करताना दिसून येतात. त्यातलाच एक प्रयोग म्हणजेच मधमाशी पालन होय. जवळपास एकूण पिकांपैकी पाच टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. तर ८५ टक्के पिकांत परपरागीभवन दिसून येते. त्यामुळेच फळ उत्पादक शेतकरी मधमाशी पालनाकडे वळू लागले आहेत. डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना देखील मधमाशी पालन फायदेशीर ठरत आहे. याबाबत मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तथा प्रमुख शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

 डाळींब पीकात कळी सेट होण्यास मदत 

केव्हीकेचे शास्त्रज्ञ अमित पाटील म्हणाले की, मधमाशीमुळे पिकाला अनेक फायदे हात असतात. यात प्रामुख्याने परागीकरण क्रिया सोप्प्या व जलद गतीने होते. मधमाशांमुळे झालेल्या परागीकरणानंतरच फुलाचे रूपांतर फळामध्ये होते. डाळींब पीकात कळी सेट होण्यात मधमाशी मुख्य भूमिका बजावत असतात. परागीभवनाच्या क्रियेत पूंकेशर (नर फुलातील परागकन) हे मादी फुलातील स्त्रीकेशरांपर्यंत (मादी फुलातील परागकण) वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते. 

बीज धारणेची प्रक्रीया

तसेच हे वहन इतर कीडी व हवेच्या माध्यमातुन ही होते, परंतू मधमाशीमुळे याचा वेग १० पटीने वाढतो, पूंकेशर व स्त्रीकेशर यांचे मीलन होऊन मादी फुलात बीज धारणेची प्रक्रीया सुरू होते. यालाच आपण गाठ सेट होणे असेही म्हणतो. ज्या फुलात परागीकरण क्रिया घडत नाही. त्यांची बीजधारणा होत नाही. म्हणजेच त्यांची गळ होते. बऱ्याच वेळा ज्या बागेत मधमाशीचे प्रमाण कमी असते, त्या बागेत कळींची गळ मोठ्या प्रमाणात होते, असे ते म्हणाले. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमालेगांवडाळिंबशेतकरी