Join us

नाशिकच्या मुक्त विद्यापीठातर्फे रुक्मिणी पुरस्कार 2023 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 7:23 PM

Nashik News : नाशिकच्या (Nashik) महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या “रुक्मिणी पुरस्कार 2023”  साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

नाशिक : दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिकच्या (Nashik) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या “रुक्मिणी पुरस्कार 2023”  साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप रूपये 21,000/- (एकवीस हजार रूपये रोख), सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. त्यामुळे इच्छुक महिलांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.         गेल्या दशकात कृषी व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व बालकल्याण, पत्रकारिता, प्रशासन, कला व क्रीडा आणि आरोग्य ह्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 वर्ष वयापर्यंतच्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक महिलांनी आपल्या कार्याची सविस्तर माहितीसह  विद्यापीठाच्या वेबसाईट https://ycmou.digitaluniversity.ac वरुन छापील अर्ज प्रिंट काढून दिनांक 26 ऑगस्ट, 2024 पर्यंत खालील पत्त्यावर पाठविण्यात यावे. 

माहितीसोबत आपल्या कार्याचे दृकश्राव्य रेकॉर्डींग, वृत्तपत्र कात्रणे, फोटो तसेच स्वतःचा पासपोर्ट आकाराचा  फोटो जोडावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि मा. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्काराबाबत पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आवाहन कुलसचिव श्री. दिलीप भरड व प्र. प्रमुख, डॉ. दयाराम पवार, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र यांच्यामार्फत करण्यात येत आहे.  

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : प्र. प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,ज्ञानगंगोत्री, गोवर्धन शिवार, गंगापूर धरणाजवळ, नाशिक – 422 222.दूरध्वनी क्रमांक : (0253) 2230127

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकविद्यापीठ