Join us

Kanda Chal Yojna : कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, काय आहे ही योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 6:08 PM

Onion Storage Scheme : शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

Kanda Chal Scheme : सर्वसाधारणपणे कांदा (Onion) जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे अनेकदा कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. मात्र शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे कांदा चाळ योजना सुरु करण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अनेकदा शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कांदा साठवून ठेवतात. अशावेळी सुयोग्य जागा नसल्याने बहुतांश शेतकरी जमिनीवर कांदा पसरवून ठेवतात. मात्र अनेकदा कांदा खराब होते, यातून शेतकऱ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर कांदा चाळ योजना शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर समजली जाते. 

कृषी विभागामार्फत कांदाचाळ या योजनेचा वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अशा विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. त्या अनुषंगाने कांदाचाळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांनी केले आहे.

कोण लाभ घेऊ शकते? 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुदानातून १० ते २५ मे. टन एवढ्या क्षमतेच्या वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभार्थी हा अल्पभूधारक व जॉबकार्डधारक (ग्रामपंचायत) असणे बंधनकारक आहे. तसेच या योजनेंतर्गत अकुशल व कुशल आदींमार्फत २५ मे. टन कांदाचाळीला १.६० लाख अनुदान दिलेजाते. कांदाचाळ सामुदायिकरीत्या शेतकरी किंवा स्वयंसहायता बचतगट किंवा शेतकऱ्यांचे उत्पादक गट, संघ लाभ घेऊ शकतात. परंतु यामध्ये कांदाचाळ बाबीचा वैयक्तिक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील.

लाभार्थी निवडीचे निकष -

शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा  पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल. 

ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

७/१२, ८ अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रतजातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी), यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

टॅग्स :कांदानाशिकशेती क्षेत्रशेती