देशभरात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णाला प्राण गमवावे लागतात. याचबरोबर शेतकऱ्यांना या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागत असते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्पदंश व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केला असून या अंतर्गत पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथे चाचणी आधारावर एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला जाणार आहे.
भारतात, दरवर्षी अंदाजे 3-4 लाख सर्पदंश झालेल्या लोकांपैकी सुमारे 50 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. जगाचा विचार केला तर भारतापेक्षा जागतिक स्तरावर सर्पदंशाने झालेले मृत्यू निम्मेच आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इन्व्हेस्टिगेशन (CBHI) च्या अहवालानुसार (2016-2020), भारतात सर्पदंशाच्या घटनांची सरासरी वार्षिक संख्या सुमारे 3 लाख आहे आणि सुमारे 2000 मृत्यू सर्पदंशामुळे होतात. यामुळेच सर्पदंश टाळण्यासाठी सरकारने एक पुस्तिका जारी केली आहे. यामध्ये सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये हे सविस्तर सांगितले आहे. याशिवाय नॅशनल रेबीज कंट्रोल वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.
तसेच लवकरच हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात येणार असून यामुळे सर्पदंशाने बाधित व्यक्ती किंवा समाजाला तात्काळ मदत, मार्गदर्शन आणि आधार देता येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तत्पर वैद्यकीय सेवा प्रदान करणे आणि सामान्य लोकांमध्ये याबद्दलची माहिती प्रसारित करणे हा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी जाहीर केलेल्या NAPSA नुसार, साप चावल्यामुळे होणारे मृत्यू आणि इतर घातक परिणाम सुरक्षित आणि प्रभावी अँटी-व्हेनम औषधे त्वरित उपलब्ध करून आणि वैद्यकीय केंद्रांपर्यंत वेळेवर पोहोचवण्याद्वारे रोखले जाऊ शकतात.
(सद्यस्थितीत केवळ पाच राज्यात चाचणी तत्वावर हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. काही दिवसांत संपूर्ण देशभरात लागू केला जाणार आहे.)
साप चावल्यास काय करू नयेपीडितेला जास्त दबाव किंवा घाबरू देऊ नका.सापावर हल्ला करण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास साप तुम्हाला स्वसंरक्षणार्थ चावू शकतो.सर्पदंशाची जखम कापू नका किंवा जखमेवर अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन किंवा औषध लावू नका.जखमेवर बांधून रक्ताभिसरण थांबवण्याचा प्रयत्न करू नका.रुग्णाला त्याच्या पाठीवर झोपायला लावू नका कारण यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.पारंपारिक पद्धतींनी उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.