नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील एका कृषी दुकानातून खरेदी केलेल्या रासायनिक खतामध्ये वाळू सदृश्य खड़े आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऐन रब्बी हंगामात घडलेल्या या प्रकारामुळे बनावट खत विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील श्री गणे कृषी सेवा केंद्रातून आहेरगाव येथील शेतकरी संदीप प्रतापराव जहागीरदार यानी २६ जानेवारी २०१४ रोजी ५० किलो पंक्किंगमध्ये २४:२४:०० या रासायनिक खताची खरेदी केली. जहागीरदार यांनी गहू व मिरची पिकासाठी खत टाकले असता, त्यात वाळूसदृश्य खड़े आढळून आले. मिरची पिकासाठी ठिंबकद्वारे खताची मात्रा देत असताना मशीन बंद पडल्याने हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान, याबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून खताचा नमुना शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. २४:२४:०० रासायनिक खत भातीद्वारे यावे लागते. ठिबकद्वारे देण्याचे खत वेगळ्या स्वरूपाचे आहे. कदाचित संबंधित खत विक्रेत्याकडून शेतक-याला माहिती देण्यात चूक झाली असावी, याबाबत कार्यवाही सुरू असल्याची प्रतिक्रिया निफाड येथील तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांनी दिली.
आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात उरल्यासुरल्ल्या पाण्यावर गहू व मिरची पीक घेतले. त्यात बनावट रासायनिक खतामुळे पिकांची वाढ सुंटली आहे. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. आम्ही नेहमी हेच खत माती व ठिबक द्वारे देतो. आताच तफावत निर्माण झाली असल्याची माहिती शेतकरी संदीप जहागीरदार यांनी दिली. संबंधित शेतकऱ्याला खत देताना मातीद्वारे देण्यास सांगितले होते. मात्र, शेतकऱ्यांनी ठिंबक द्वारे खत दिले. २४:२४:०० सात पाण्यात भिजवून द्यावे लागते. शेतकयाकडून काही तरी चूक झाली असावी, असा निर्वाळा पिंपळगाव येथील कृषी सेवा केंद्राचे सुनील उगले यांनी सांगितले.
कृषी अधिकारी करणार रासायनिक खतांची पाहणी
आहेरगाव येथील शेतकन्याला वाळूसदृष्य खडे असलेले रासायनिक खत मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने याबाबत निफाडचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांच्याकडे लेखी तक्रार केली. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे याबाबत अधिकारी उद्याच भूमिका स्पष्ट करतील.