Lokmat Agro >शेतशिवार > Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई 

Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई 

Latest News Compensation to heat damaged banana growers see list of mahsul mandal | Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई 

Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई 

Banana Issue : जळगाव जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी नुकसानभरपाईच्या (Crop Relief Fund) रकमेसाठी पात्र ठरले आहेत.

Banana Issue : जळगाव जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी नुकसानभरपाईच्या (Crop Relief Fund) रकमेसाठी पात्र ठरले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव :  जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) एप्रिल व मे महिन्याच्या उष्णतेच्या लाटांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. अती तापमानामुळेकेळी बागांना फटका बसला होता. दरम्यान, एप्रिलनंतर आता मे महिन्याच्या अती तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळ हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतंर्गत पात्र ठरली आहेत. त्यामुळे या मंडळांमधील शेतकरी हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईच्या रकमेसाठी पात्र ठरले आहेत.

२०२३-२४. या हंगामात नोव्हेंबर महिन्यात कमी तापमानाच्या (temperature) निकषात ३६ महसुल मंडळं पात्र ठरली होती. तर एप्रिल महिन्यात अती तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरली होती. दरम्यान, आता मे महिन्यात अनेक महसूल मंडळांमध्ये सलग पाच दिवस ४५ अंशापेक्षा जास्त तापमान होते. त्यामुळे अशी 51 महसूल मंडळ मे महिन्यातील अति तापमानाच्या निकषात पात्र ठरले आहेत. दरम्यान जी महसूल मंडळ एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांच्या निकषात पात्र ठरली आहेत. अशा शेतकऱ्यांना केवळ मे महिन्यातील नुकसान भरपाईची रक्कम मिळेल तर जे शेतकरी मे महिन्यात पात्र ठरले नाहीत, मात्र एप्रिल महिन्यात पात्र ठरले होते, अशा शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यातील निकषाप्रमाणे हेक्टरी 36 हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.


यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. विशेष करुन एप्रिल व मे महिन्यात तापमान प्रचंड वाढले. मे महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. केळीचे नुकसान झाले. सलग पाच दिवस तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील ५१ महसुल मंडळ हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसुल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे.

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंशापेक्षा जास्त तापमान होते. त्यामुळे ५१ महसूल मंडळांमधील शेतकरी या निकषात पात्र ठरले आहेत. तर एप्रिल महिन्यात ७५ महसुल मंडळ पात्र ठरली होती. यंदा अती 'तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५० हजारहून अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे. 

- उन्मेष पाटील, खासदार

मे महिन्यात पात्र ठरलेली महसूल मंडळ...

अमळनेर - अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे.
भडगाव - भडगाव, कोळगाव.
चाळीसगाव - खडकी बूं., शिरसगाव.
धरणगाव - धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
एरंडोल - एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह.
जळगाव - आसोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिप्राळा.
पाचोरा - कुन्हाड बु., पाचोरा.
पारोळा - बहादरपूर, पारोळा, शेळावे, तामसवाडी.
भुसावळ - वरणगाव.
चोपडा - चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर.
जामनेर - जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी.
मुक्ताईनगर - कुहे, मुक्ताईनगर.
रावेर - ऐनपुर, खानापूर, खिंडर्डी बु., खिरोदा, निभोरा बु., रावेर, सावदा
.

Web Title: Latest News Compensation to heat damaged banana growers see list of mahsul mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.