Join us

Paddy Production : धानाच्या शेतीचा खर्च वाढला, एकरी किती खर्च येतो? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 5:01 PM

Paddy Farming : यामुळे धानाच्या शेतीचा (Paddy Farming) एकरी लागवड खर्च २१ ते २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

गडचिरोली : धानाच्या शेतीचा (Paddy Farming) खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मशागतीचा खर्च, खते, बियाणे यांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढलेले दर, पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ यामुळे धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २१ ते २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर एकरी धानाचे उत्पादन हे १८ ते २० क्विंटल असून त्यातून खर्च वजा जाता तीन चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या हाती शिल्लक राहतात. 

उत्पादन तेवढेच खर्च मात्र वाढला...यांत्रिकीकरणाच्या पूर्वी या पूर्वी शेती मशागतीचा (Farming) खर्च कमी होता. त्यामुळे उत्पादन थोडे कमी झाले तरी शेतकरी आर्थिक अडचणीत येत नव्हता. आता मात्र यांत्रिकीकरणामुळे शेतीचा खर्च भरमसाठ वाढला आहे. हा खर्च भरून निघण्यासाठी १०० टक्के उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्के खर्च होते. जेमतेम २० टक्के नफा मिळते. त्यातही उत्पादनात घट झाल्यास मोठा फटका संबंधित शेतकऱ्याला सहन करावा लागतो. निर्सगाने साथ दिली तर २० टक्के नफा मिळतो. नाहीतर नूकसानच सहन करावे लागते. 

शेती व्यवसायात फारसा नफा मिळत नाही. ट्रॅक्टरचा वापर सुरू झाल्यापासून गेल्या चार ते पाच वर्षात मशागतीच्या खर्चात बरीच वाढ झाली आहे. डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टरने नांगरणी करणे अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. उत्पादन खर्च अधिक वाढत आहे तर धानाच्या दरात कमी प्रमाणात वाढ होत आहे. - मारोती सहाकाटे, शेतकरी.

20 वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १६३३ रुपयांनी वाढ२० केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडून दरवर्षी सर्वच पिकांच्या हमीभावात वाढ केली जाते. सन २०२४-२०२५ करिता धानाच्या हमीभावात ११७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता धानाला क्विंटलला २३०० रुपये भाव मिळत आहे. गेल्या २० वर्षात धानाच्या हमीभावात केवळ १६३३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर २० वर्षांत धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

असा येतो शेती खर्च (एकरमध्ये)• ट्रॅक्टरने नांगरणी : ५००० रूपये.• धान रोवणी : ४००० रूपये.• खते किटकनाशके: ५००० रूपये.• धान कापणी : ३५०० रूपये, मळणी: १५०० ते १८०० रूपये.• फवारणी, पाणी करणे तत्सम मजूरी: २००० रूपये.

टॅग्स :भातशेतीलागवड, मशागतशेती क्षेत्रपेरणी