- सुनील चरपेनागपूर : मागील खरीप हंगामाच्या तुलनेच चालू खरीप हंगामात (Kharif Season) संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. तुलनेत साेयाबीनसह (Soyabean) इतर तेलबिया, डाळवर्गीय पिके आणि भरडधान्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीक्षेत्र घटल्याने कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता बळावली असली दर मात्र दबावात राहणार आहेत.
ऑगस्टचा पहिला आठवडा हा देशातील देशातील खरीप पिकांच्या पेरणीचा शेवटचा काळ मानला जाताे. २ ऑगस्टपर्यंत देशभरात ९०४.६० लाख हेक्टरवर विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी डाळवर्गीय पिकांचे पेरणीक्षेत्र १०.९० लाख हेक्टर, भरडधान्याचे ५.२१ लाख हेक्टर, साेयाबीनचे ३.२६ लाख हेक्टर, तेलबियांचे ५.९० लाख हेक्टर, तर धानाचे क्षेत्र १३.९० लाख हेक्टरने वाढले आहे.
देशात मागील वर्षी एकूण १२५.२०० लाख हेक्टरवर कापसाची पेरणी (cotton Cultivation) करण्यात आली हाेती. हे क्षेत्र ६ ऑगस्टपर्यंत १०८.८३७ लाख हेक्टरवर स्थिरावले आहे. देशातील १० प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र चार हजार ते ३.३० लाख हेक्टरने घटले आहे. त्यामुळे १ ऑक्टाेबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कापूस वर्षात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता बळावली असून, याचा कापसाच्या दरवाढीवर काय परिणाम हाेताे, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे....कापूस पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर) (६ ऑगस्टपर्यंत)राज्य - २०२४-२५ - २०२३-२४ - घटपंजाब - १.००० - १.७५० - ०.७५०हरयाणा - ४.७६० - ६.६५० - १.८९०राजस्थान - ४.९४९ - ७.९१० - २.९६१गुजरात - २३.३५४ - २६.८२० - ३.४६६महाराष्ट्र - ४०.६४२ - ४२.२२० - १.५७८मध्य प्रदेश - ६.१४० - ६.३०० - ०.१६०तेलंगणा - १६.५५३ - १८.२२० - १.६६७आंध्र प्रदेश - २.३६० - २.२७० - ०.०९कर्नाटक - ६.६१० - ६.९२० - ०.३१०तामिळनाडू - ०.०५८ - १.६२० - १.५६२ओडिशा - २.१७० -२.३५० - ०.१८०इतर - ०.२४१ - ०.१७० - ०.०७१ (वाढ)एकूण - १०८.८३७ - १२५.२०० - १६.३६३
कुठे फायदा, तर कुठे फटकाअतिपाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील कापसाच्या पिकाची वाढ खुंटल्यागत झाली असून, पिकाची अवस्था सध्यातरी वाईट आहे. खान्देश, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पिकाची अवस्था चांगली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
गुलाबी बाेंडअळीच्या प्रादुर्भाव व मजुरांच्या कमतरतेमुळे पंजाब, हरयाण व राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र सरासरी ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलाबी बाेंडअळीची नुकसान पातळी सध्यातरी ७५ टक्के कमी आहे. यावर्षी तिन्ही राज्यांमध्ये उशिरा पेरणी झाल्याने तसेच पिके चांगली असल्याने या राज्यांमधील कापूस सप्टेंबरमध्ये बाजारात येईल.- नवनीतसिंह सैनी, संस्थापक,इंडियन काॅटन इनसाइट्स, हरयाणा.