Join us

जमिनीची ऑनलाईन मोजणी कशी कराल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:38 AM

जमिनीची ऑनलाईन मोजणी प्रक्रिया सुरु झाली असून तुम्हालाही तुमच्या जमिनीची ऑनलाईन मोजणी करता येणार आहे. 

शेतीच्या बांधावरून, अनेकदा वादाचे प्रकार समोर आले आहेत. अनेक प्रकरणे तर न्यायालयात प्रलंबित आहेत. काहीवेळा जमिनीच्या मोजणीवरून देखील वाद झाल्याचे निदर्शनास आले आहे. मग त्यासाठी सतत प्रशासकीय यंत्रणांकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता हे काम घरबसल्या करता येत आहे. जमिनीची ऑनलाईन मोजणी प्रक्रिया सुरु झाली असून तुम्हालाही तुमच्या जमिनीची ऑनलाईन मोजणी करता येणार आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन जमीन मोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना जर आपल्या जमिनीची मोजणी करावयाची असल्यास थेट तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाईन अर्ज करता येत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे आणि शेतजमीन मोजणीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

असा करा प्रक्रिया 

शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी ई मोजणी महा भूमी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या संकेतस्थळावर गेल्यावर एक विंडो ओपन होईल. ज्यात आपली प्राथमिक माहिती भरणे आवश्यक असते. जसे की स्वतःचे नाव, पत्ता, इमेल आयडी इत्यादी नोंदणीसाठी भरावे लागते. यानंतर तुमचा लॉग इन  होऊन पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जाते. यानंतर लॉग इन साठी विंडो ओपन होईल. यात युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे. यात तुम्हाला तुमच्या अर्जाचा सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती मिळेल. शेतकऱ्यांना तात्काळ मोबाईल नंबरवर आपली शेतजमीन मोजणीची तारीख, मोबाईल संदेशाद्वारे कळवण्यात येईल. पुढील पंधरा दिवसाच्या आत सदरील जमिनीची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचा अचूक नकाशा कार्यालयात न जाता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

टॅग्स :शेतीऑनलाइनशेतकरी