Join us

Crop Sap Scheme : पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापनासाठी १५ कोटी इतका निधी मंजूर, 'या' पिकांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 7:14 PM

Crop Sap Scheme : पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजनेअंतर्गत रु.१५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

Crop Sap Scheme : सन २०२४-२५ मध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी व ऊस, तसेच, फळपिके आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा, चिक्कू, काजू, भेंडी व टोमॅटो या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या (Crop Management) दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजनेअंतर्गत रु.१५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

खरीप हंगामातील (Kharip Season) प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजना राबविण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये रु.२५.०० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संचालक (वि. व प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरुन प्रस्तुत योजनेअंतर्गत रु.१५ कोटी इतका निधी वितरत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सन २०२४-२५ मध्ये क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणीसाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. 

सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासन निर्णयातील तरतूदी तसेच वित्त विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीच्या मर्यादेत खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील. तसेच उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.

कृषी आयुक्त हे नियंत्रण अधिकारी असतील 

तसेच कृषी आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून व आयुक्तालय स्तरावरील खर्चासाठी सहाय्यक संचालक, लेखा-१, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, विभागीय कृषि सहसंचालक स्तरावर विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेतीखरीप