Rabbi Season 2024 : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2 डिसेंबर 2024 रोजी रब्बी पिकांखालील क्षेत्राची वाढ जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या 187.97 लाख हेक्टर गहूपेरणीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 200.35 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी (Wheat Sowing) झाली आहे. तर गेल्या वर्षी 105.14 लाख हेक्टरवर झालेल्या रब्बी कडधान्य पेरणीच्या तुलनेत यंदा 108.95 लाख हेक्टर क्षेत्र कडधान्य पेरणीखाली आले आहे.
रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून (Rabbi Season) अधिक पीक पेरणी झाली असून त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांचा सविस्तर पेरणी अहवाल पाहुया. गव्हाची 2023 24 वर्षी 187.97 हेक्टर तर यंदा म्हणजे 2024 25 वर्षी 200.35 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा पिकाची मागील वर्षी 74.39 लाख हेक्टर तर यंदा 78.52 लाख हेक्टर वर पेरणी, तर मसुरीची मागील वर्षी 12.77 लाख हेक्टर र यंदा 13.45 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तर रब्बी हंगामातील वाटाणा पिकाची मागील वर्षी 7.43 लाख हेक्टर तर यंदा 7.54 लाख हेक्टरवर पेरणी, ज्वारी पिकाची मागील वर्षी 14.6 लाख हेक्टर तर यंदा 17.43 लाख हेक्टरवर पेरणी, बाजरी पिकाची मागील वर्षी 0.06 लाख हेक्टर तर यंदा 0.05 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका पिकाची मागील वर्षी 6.53 लाख हेक्टर तर यंदा 6.87 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तसेच भुईमूग पिकाची मागील वर्षी 2.11 लाख हेक्टर तर यंदा 1.97 लाख हेक्टर पेरणी, सूर्यफुलाची 0.15 लाख हेक्टर तर यंदा 0.20 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 24.67 लाख हेक्टरवर श्री अन्न आणि भरड तृणधान्याच्या पेरणीच्या तुलनेत यंदा 29.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Crop Cultivation : 'टोकण अन् ठिबक' वर झाली तूर यशस्वी ; एकेका झाडाला लगडल्या आठशे ते हजारावर शेंगा