Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane : अहमदनगरच्या ऊसाचा परराज्यात डंका, रोज दीडशे टन ऊस रसवंतीला!

Sugarcane : अहमदनगरच्या ऊसाचा परराज्यात डंका, रोज दीडशे टन ऊस रसवंतीला!

Latest News Demand from haryana, Delhi, Uttar Pradesh for sugarcane of Nevasa | Sugarcane : अहमदनगरच्या ऊसाचा परराज्यात डंका, रोज दीडशे टन ऊस रसवंतीला!

Sugarcane : अहमदनगरच्या ऊसाचा परराज्यात डंका, रोज दीडशे टन ऊस रसवंतीला!

Agriculture News : नेवासा तालुक्यातील उसाला रसवंतीसाठी परराज्यातूनही मागणी वाढू लागली आहे.

Agriculture News : नेवासा तालुक्यातील उसाला रसवंतीसाठी परराज्यातूनही मागणी वाढू लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अहमदनगर  : नेवासा तालुक्यातील उसाला रसवंतीसाठी (Sugarcane juice) परराज्यातूनही मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे त्या उसाला भावही ३५०० रुपये प्रतिटन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांऐवजी रसवंतीला ऊस देणे परवडत आहे. दिवसभरात जवळपास दीडशे टन ऊस रसवंतीला लागत असून शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होत आहे. 

महाराष्ट्रात आठवडाभरापासून पाऊस (Rain) सुरू असला तरी उत्तर भारतात अद्यापही उन्हाचा चटका कायम आहे. त्यामुळे दुपारी शहरी भागासोबतच ग्रामीण, निमशहरी भागात उसाचा रस पिणे नागरिक पसंत करत आहेत. त्यामुळे रसवंतीसाठी उसाला चांगली मागणी आहे. महाराष्ट्रासह हरयाणा, पंजाब (Punjab), राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश (Uttarpradesh) येथून रसवंतीसाठी नेवासा तालुक्यातील उसाला पसंती मिळत आहे.


१२ ते १५ उसाची मोळी 
आपल्या राज्यातही विविध ठिकाणी नेवासा तालुक्यातील उसाला वाड्यासह रसवंती, जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी असते. अशा उसाला २५०० ते २८०० प्रतिटन भाव मिळतो. परराज्यात जाणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटनाचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. परराज्यात जाणाऱ्या उसाची तोडणी करताना वाढे छाटले जातात. सरळ असलेल्या १२ ते १५ उसाची मोळी सुतळीने बांधतात.


दररोज दीडशे टन ऊस रसवंतीला 
एका ट्रकमध्ये २० टन ऊस वाहतूकदार नेतात. त्याचे भाडे ३५ ते ४५ हजार रुपये होते. २० टन उसाचे ट्रकसाठी राजस्थान, दिल्ली, पंजाब या राज्यासाठी आहे. ऊस तोडणी कामगारांना ५०० रुपये प्रतिटन पैसे व चाऱ्यासाठी वाढे मिळतात. सध्या तालुक्यातून दररोज १०० ते १५० टन ऊस रसवंतीसाठी एजंटमार्फत पाठविला जातो. येत्या हंगामात उसाची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे.

शहरात बाराही महिने रसवंतीगृह.. 

राजमार्गाच्या दुतर्फा, शहरात बसस्थानक वर्दळीच्या ठिकाणी रसवंतीगृह थाटलेले आहेत. ग्रामीण, निमशहरी भागात फिरते रसवंतीगृह सुरू आहेत. नागरिकांकडून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ऊस पुरवठादार व्यावसायिकांचा व्यवसाय जोरात आहे. हा व्यवसाय हंगामी असला तरी मोठ्या शहरात बाराही महिने हा व्यवसाय चालतो. नेवासा तालुक्यातून दरवर्षी परराज्यात उसाचा पुरवठा होतो. त्यामुळे या भागातील मजुरांना ऊस तोडणीच्या कामातून चार महिने चांगला रोजगार मिळतो.

Web Title: Latest News Demand from haryana, Delhi, Uttar Pradesh for sugarcane of Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.