Lokmat Agro >शेतशिवार > Dhan Bonus : 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस मंजूर, इतकी रक्कम खात्यावर येणार

Dhan Bonus : 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस मंजूर, इतकी रक्कम खात्यावर येणार

Latest News dhan Bonus Farmers in Thane district will get paddy bonus in bank accounts | Dhan Bonus : 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस मंजूर, इतकी रक्कम खात्यावर येणार

Dhan Bonus : 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस मंजूर, इतकी रक्कम खात्यावर येणार

Dhan Bonus : धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस (Dhan Bonus) लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Dhan Bonus : धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस (Dhan Bonus) लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Dhan Bonus : अखेर ठाणे जिल्ह्यातील (Thane District) काही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस (Dhan Bonus) लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून प्रति क्विंटल ७०० प्रमाणे एकुण रक्कम ७९ लाख ७१ हजार २९२ रुपये इतकी प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. 

खरीप पणन हंगाम (Kharif Season)२०२०-२१ साठी राज्य शासनाने ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी घोषीत करुन धान उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२०-२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड खरेदी केंद्रावर (Dhan Kharedi Kendra) ५०० शेतकऱ्यांच्या ११३८७.५६ क्विंटल धानाची लॉट एन्ट्री रब्बी हंगामात झाली. परंतु सदर धानसाठा हा प्रत्यक्ष खरीप हंगामातील असल्याने त्यांना देखील प्रोत्साहनपर राशीची रक्कम मंजूर करण्याची विनंती करण्यात येत होती.

अधिक माहितीसाठी शासनाचा जीआर पहा 

त्या अनुषंगाने मुरबाड खरेदी केंद्रावरील ५०० शेतकऱ्यांच्या ११३८७.५६ क्विंटल धानाकरीता प्रति क्विंटल ७०० प्रमाणे एकुण रक्कम ७९ लाख ७१ हजार २९२ रुपये इतकी प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. 

शेतकरी नोंदणी पाहूनच.... 
खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने, पणन हंगाम २०२०-२१ साठी धान/भरडधान्य खरेदीबाबतच्या सर्व अटी व शर्तीनुसारच शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घेवून त्यांना प्रोत्साहनपर राशी वितरीत करण्यात यावी. नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरिता जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांचेविरुध्द कठोर कारवाई करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Latest News dhan Bonus Farmers in Thane district will get paddy bonus in bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.