Kharif Crops :खरीप पिकांच्या (Kharif Crop) लागवडीचा काळ असून सध्या अनेक भागात पेरणीसह (Cultivation) लागवड सुरु आहे. अशा स्थितीत खरीप पिकाच्या उत्पादनवाढीसाठी नेमक्या गोष्टी करायला हव्यात, हे समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी माहिती दिली आहे. यात जमिनीची पूर्वमशागत, सुधारित बियाण्याचा वापर व हेक्टरी रोपांची योग्य संख्या, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण ही पंचसूत्री लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. जमिनीची पूर्वमशागत :
मध्यम/भारी जमिनीत २/३ वर्षात खोल नांगरट, पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर जमीन भुसभूसीत होण्यासाठी वखराच्या एक-दोन पाळ्या देणे.
२. सुधारित बियाण्याचा वापर व हेक्टरी रोपांची संख्या :
सुधारित व जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची खरेदी करून शिफारशीप्रमाणे बियाण्यांचा व योग्य अंतराचा वापर केल्याने हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखली जाते.
3. संतुलित खत व्यवस्थापन :
शिफारशीत रासायनिक खताची मात्रा पीक चांगले उगवून आल्यावर (पेरणीनंतर) २-३ आठवडयांनी पिकास एकाच वेळी दिल्याने उत्पादन वाढीस मदत घेते
४. पाणी व्यवस्थापन :
पावसाच्या खंडात १-२ पाणी उपलब्ध असल्यास शक्यतो पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत दिल्यास उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
५. पीक संरक्षण
वेळीच रोग/ किडीचे संरक्षण केले नाहीत ही तर पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत घट येते. तेव्हा शिफारशीप्रमाणे पीक संरक्षण केल्याने ही घट टाळता येते.
संकलन : निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ : डॉ. कल्याण देवळाणकर