Lokmat Agro >शेतशिवार > Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची सफल शेती, आजवर 10 लाखांहून अधिक उत्पन्न, वाचा सविस्तर 

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची सफल शेती, आजवर 10 लाखांहून अधिक उत्पन्न, वाचा सविस्तर 

Latest News dragon Fruit Farming Successful farming of dragon fruit, income of more than 10 lakhs, read in detail | Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची सफल शेती, आजवर 10 लाखांहून अधिक उत्पन्न, वाचा सविस्तर 

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रुटची सफल शेती, आजवर 10 लाखांहून अधिक उत्पन्न, वाचा सविस्तर 

Dragon Fruit Farming : शिंदखेडा तालुका दुष्काळी व कमी पर्जन्यमान असलेला तालुका असल्याने या भागात ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit Farming) लागवड तालुक्यात फायद्याची ठरत आहे. 

Dragon Fruit Farming : शिंदखेडा तालुका दुष्काळी व कमी पर्जन्यमान असलेला तालुका असल्याने या भागात ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit Farming) लागवड तालुक्यात फायद्याची ठरत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील प्रयोगशील शेतकरी भरतसिंग नवलसिंग राजपूत यांनी शेतीत नवीन प्रयोग करून तालुक्यात प्रथमच ड्रॅगन फ्रुटची (Dragon fruit) लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून स्थानिक व्यापारी, दोंडाईचा मार्केट व शिरपूर मार्केटमध्ये विक्री करत आजवर १० लाखांहून अधिक उत्पन्न राजपूत यांना मिळाले. 

कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन विकास (Krushi Vibhag) अभियान योजनेतून टप्प्या-टप्प्याने अनुदान मिळाले. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कायम मार्गदर्शन लभाल्याचे भरत राजपूत सांगतात. ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Farming) हे पीक हलक्या व कमी पाण्यात येणारे कमी मेहनतीचे पीक आहे. शिंदखेडा तालुका दुष्काळी व कमी पर्जन्यमान असलेला तालुका असल्याने या भागात ड्रॅगन फ्रुटची लागवड तालुक्यात फायद्याची ठरत आहे. 

भरतसिंग राजपूत यांच्याकडे १० एकर शेती असून, ३ एकर बागायत व ७ एकर कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यांनी ३ वर्षापूर्वी दीड एकर क्षेत्रावर रेड जम्बू वानाची ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यासाठी त्यांनी आधी युट्यूबवरवरून माहिती मिळवली. तसेच, हैदराबाद व तेलंगणा राज्यांत जाऊन तेथील शेतकऱ्यांकडून पिकाची माहिती जाणून घेत लागवड केली.

व्यवस्थापनातील ठळक बाबी 
राजपूत यांनी २०२१ मध्ये गुजरात येथून ड्रॅगन फ्रुटचे ३ हजार खोड (रोप) ५५ रु. प्रमाणे विकत आणले व १२ बाय ८ फुटांवर खोल खड्डे खोदून त्यात ६ फूट उंचीचे ७५० सिमेंट खांब रोवले. जमिनीपासून ४ ते ५ फुटांवर त्या खांबांवर सिमेंट प्लेट बसवून घेतल्या. जमिनीपासून १.५ ते २ फूट उंचीचे वरंभे त्यात चांगले कुजलेले शेणखत मिश्रण केले व खांबांच्या चारही बाजूने एक-एक रोपे लावले. एकरी ४०० खांब व १६०० रोपे लागले व त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. जमिनीचा मगदूर पाहून फेब्रुवारी ते मेपर्यंत कमी पाण्याचा त्यांनी अवलंब केला.

भरतसिंग राजपूत हे शेतीत नवनवीन प्रयोग करीत असून, त्यासाठी कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन पारंपरिक शेती पाठोपाठ ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळावे.
- देवेंद्र नागरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा

Web Title: Latest News dragon Fruit Farming Successful farming of dragon fruit, income of more than 10 lakhs, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.