Join us

Agriculture News : ...तर कृषी मंत्र्यांच्या घरी जावून आंदोनल करु, शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 5:24 PM

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटीचे अनुदान रखडले आहे.

नाशिक : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक‘ घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २५ कोटीचे अनुदान रखडले आहे. ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत. शेतकऱ्यांना ऑगस्ट महिना अखेर अनुदान मिळाले नाही तर जय किसान फार्मर्स फोरमच्या माध्यमातुन थेट कृषी मंत्र्यांच्या घरावरच आंदोलन करु असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांनी जिल्हा कृषी उपसंचालकांना दिला.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील तसेच चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) शेतकºयांनी सोमवारी जय किसान फार्मर्स फोरमच्या माध्यमातुन जिल्हा उपसंचालक जगदिश पाटील व जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांची भेट घेत त्यांना तुषार व ठिबक योजनेच्या रखडलेल्या अनुदानाबाबत निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरवण्यात आले. 

दरम्यान ‘महा डीबीटी‘च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड क रण्यात आली. निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया देखील झाली. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित होणे अपेक्षीत असतांना ते अद्याप झालेले नाही. हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते. मात्र, काही महिन्यापासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक‘ लागला आहे.जिल्ह्यातील जवळपास ८५०० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला असून अजून या अनिदानाचे पैसे शेतकयांच्या बँक खात्यात आलेले नाही. 

शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत 

तसेच २०२३-२४ सालातील ठिबक संच विक्रेत्याचे पैसे काहीतरी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी भागविले आहेत. परंतु ते अनुदान स्वरूपातील पैसे आज मिळतील उद्या मिळतील, या आशेने लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत. अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे अनुदान रखडले. दरम्यान ३१ मार्च पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते. ठिबकचे अनुदान वर्ग करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे अनुदान अडकले. आता आचारसंहिता संपली पण अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

अनुदान कधी मिळणार? 

शेतकरी शांताराम की, एक-दीड वर्षांपूर्वी ठिबक योजनेचा लाभ घेतला. अनेकदा मुदलाक पाणी नसल्याने ठिबकचा वापर सोयीस्कर ठरतो, या दृष्टीने या योजनेतून ठिबक घ्याचे ठरविले. त्यानुसार शासनाच्या कृषी सिचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर ठिबक खरेदी केले. त्यावेळी साधारण २० टक्के रक्कम म्हणजे जवळपास वीस हजार रुपये भरले. साधारणतः ९२ हजार रुपयांचा ठिबकचा संच असल्याने वीस टक्के रक्कम तात्काळ भरली. मात्र हे अनुदान अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपाणीपाटबंधारे प्रकल्पनाशिक