Lokmat Agro >शेतशिवार > E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०? 

E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०? 

Latest News E Mojni Counting land in just an hour, what is E Mojni version 2.0 see details | E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०? 

E Mojni : अवघ्या तासाभरात होतेय जमिनीची मोजणी, काय आहे 'इ मोजणी व्हर्जन २.०? 

E Mojani : जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.

E Mojani : जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Land E Mojani : जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करणे आणि शुल्क भरणे यासह दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी 'इ मोजणी व्हर्जन २.०' (E Mojani  2.0) ही अद्ययावत संगणकप्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. 

दरम्यान, वर्षभरापूर्वी या प्रणालीचा वापर नंदुरबार (Nandurbar) व वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांत जमिनीची मोजणी वेळेवर होत नसल्यामुळे अनेक जमिनी वादात अडकल्या असून, पडीक पडल्या आहेत. शेतीपेक्षा शेतकऱ्यांना भाऊबंदकीमध्ये बांध आणि दगडावर अधिक लक्ष असते. त्यामुळे अशी अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित पडलेली आहेत. अशी प्रकरणे तातडीने मोजणी झाली तर न्यायालयातील जमिनीबाबतची अनेक प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे. 

या मोजणीतून जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्ट वाटप, कोर्टकमिशन व विविध प्रकल्पाकरिता भूमी संपादन, आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. दाखल होणाऱ्या मोजणी अर्जातील जमिनीची मोजणी जीआयएस आधारित रोव्हर्सवर करण्यात येईल. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीच्या अक्षांश व रेखांश याची माहिती प्राप्त होईल. परिणामी जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. 

संपूर्ण राज्यात लागू 
वर्षभरापूर्वी या प्रणालीचा वापर करण्यास सुरवात झाली असून नंदुरबार व वाशिम जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यात ही प्रणाली लागू करण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्हे, तालुक्यात ती लागू करण्यात आली असून, आता संपूर्ण राज्यात ही संगणक प्रणाली लागू करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाने काढला आहे. 

ई-मोजणीचे असे असणार फायदे... 

  • जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार. 
  • मोजणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा. 
  • अर्जाची सद्यःस्थिती एसएमएसने समजणार. 
  • जमीन मोजणी प्रत ऑनलाइन मिळणार. 
  • मोजणीच्या नकाशावर अक्षांश, रेखांशाची माहिती असणार. 
  • जमिनीचे लोकेशन कळणार.

Web Title: Latest News E Mojni Counting land in just an hour, what is E Mojni version 2.0 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.