नाशिक : पाच वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रावर लावलेल्या लिंबाच्या बागेला ऐन उन्हाळ्यातपाणी कमी पडू लागल्याने ही बाग सोडून द्यावी लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यापुढे प्रपंच कसा चालवायचा याचे संकट उभे ठाकले आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या हेतून लिंबाची केलेली लागवड या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारी ठरली आहे.
बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील चेतन कांतीलाल शेलार या युवकाने मोठ्या हिमतीने १०० लिंबूचे रोप आणून जवळपास पाच वर्षापासून त्यांना पोटाच्या पोरासारखं सांभाळून वाढवत आहेत. पाच वर्षापासून लिंबूचे उत्पादन मिळेल, या आशेवर एक एकर शेती बागेसाठी अडकली. उत्पादन निघण्याची वेळ आली आणि विहिरीने तळ गाठल्यामळे त्याला पाण्याअभावी अन्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने बाग सोडून देण्याची वेळ आली आहे.
बागलाण तालुक्यामध्ये लिंबाच्या लागवडीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र त्यामध्येही या शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाला मोठी मागणी असते. या काळामध्ये जर या शेतकऱ्याला लिंबांचे उत्पन्न मिळाले असते तर त्याला त्यापासून मोठा फायदा झाला असता. मात्र त्याच्या विहिरीच्या पाण्याची पातळीच खालावल्याने बाग सोडावा लागला.
फळांची संख्या कमी
उन्हाळ्यात या लिंबूच्या बागेसाठी पाणी कमी आल्यामुळे या युवा ढे मोठा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न आहे. उन्हाळ्यात लिंबूला मागणी असते परंतु पाणी कमी झाल्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात झाडांना फळे देखील लागले नसल्याने त्याची निराशा झाली. साधारणपणे या लिंबू बागेसाठी आतापर्यंत ५० ते ६० हजार रुपये खर्च झाला. आणि पाच वर्षापासून एक एकर शेती लिंबू बागेमध्ये अडकल्यामुळे अन्य उत्पादनही घेता आलेले नाही. उन्हाळ्यात पाणी मिळाले असते तर या लिंबू बागेपासून शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळाला असता, लिंबूची बाग ऐन मोसमात सोडून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.