Join us

Ek Ped Maa Ke Naam : 'एक पेड माँ के नाम' अभियान, सप्टेंबर 2024 पर्यंत 80 कोटी रोपे लावण्याचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 8:20 PM

Ek Ped Maa Ke Naam : येत्या सप्टेंबर 2024 पर्यंत देशात 80 कोटी रोपे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Ek Ped Maa Ke Naam : जागतिक पर्यावरण दिनापासून “एक पेड मा के नाम' ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे असा या योजनेचा उद्देश असून पीएम मोदी यांनी या अभियानाला सुरवात केली आहे. येत्या सप्टेंबर 2024 पर्यंत देशात 80 कोटी रोपे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानुसार 'एक पेड माँ के नाम' हे अभियान राबविण्यात येत आहे. 

सद्यस्थितीत बदलत्या हवामान बदलाचा परिणाम सजीवसृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होत आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्वाची मानली आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. म्हणूनच एक पेड माँ नाम हे जागतिक अभियानाचा सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 पर्यंत देशभरात 80 कोटी रोपे आणि मार्च 2025 पर्यंत 140 कोटी रोपे लावण्याचा निर्धार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात 20 जून 2024 रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले.

या मोहिमेचा एक भाग म्हणून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्ट रोजी मोहीम राबविण्यात येत आहे. सकाळी 10:00 वाजता आयएआरआय कॅम्पस, पूसा, नवी दिल्ली येथे सुरू होईल. कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांतर्गत सुमारे 1 एकर जागेत वृक्ष लागवड करण्यात येईल. यास "मातृ वन" असे संबोधण्यात येईल. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत ८०० हून अधिक संस्था सहभागी होणार असून या कार्यक्रमात ३ ००० ते ४००० रोपांची लागवड केली जाणार आहे.                

हे अभियान एक जनचळवळ 

हे अभियान एक जनचळवळ असून लोक वृक्षारोपण करून आपल्या मातेला आणि पृथ्वीमातेला मान वंदना दिली जात आहे. शेतीमध्ये शाश्वत शेती साध्य करण्यासाठी वृक्षलागवड हे महत्त्वाचे पाऊल आहे. माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढविण्यास झाडे मदत करतात. लाकूड व बिगर लाकूड उत्पादनातून ही झाडे प्रसिद्धांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देतात. या अभियानात जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरण रोखण्याची आणि ती बदलण्याची अफाट क्षमता आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीइनडोअर प्लाण्ट्सपर्यावरण