Join us

धुळे जिल्ह्यात उन्हाळी कांदा उत्पादनात घट, खर्चाच्या तुलनेत भाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 4:43 PM

यंदा विहिरींना पुरेसे पाणी नसल्यामुळे व प्रतिकूल हवामानामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

यंदा विहिरींना पुरेसे पाणी नसल्यामुळे व प्रतिकूल हवामानामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. धुळे जिल्ह्यातील देऊर परिसरात देखील अशीच परिस्थिति असून विहिरींची पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी अर्ध्यावरच कांदा काढणी सुरू केली तर काही शेतकऱ्यांनी आहे. त्या स्थितीत कांदा शेत सोडून दिले आहे. 

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही पट्ट्यात उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. दुसरीकडे यंदा कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल आहेत. अशातच उन्हाळ कांद्याची लागवड झालेला कांदा आता काढणीला आलेला आहे. मात्र पुरेसे पाणी नसल्याने अनेक भागात कांदा पिकावर परिणाम झाला आहे. कांदा रोपण्यापासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च येतो. प्रतिकिलो ३५ रुपये प्रमाणे कांद्याला खर्च येतो. आजच्या स्थितीत एक हजार ते पंधराशे पर्यंत बाजार भाव आहेत. त्यात गाडी भाडे, तथा ट्रॅक्टरमध्ये कांदे भरणे. आडत, कटती आदी वजावटीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. 

तसेच प्रतिकूल हवामानाच्या बदलामुळे कांद्याला अपेक्षित आकार मिळाला नाही. एकीकडे अशी परिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे कांद्याला खर्चाच्या तुलनेत भाव नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अचडणीत आला आहे. केंद्र सरकारकडून व ७ डिसेंबरपासून शंभर टक्के कांदा निर्यात बंदी केली होती. ३१ मार्चला कांदा निर्यात खुली होणे अपेक्षित असताना केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांच्या सहीने २२ मार्च रोजी एक परिपत्रक काढले. पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असेल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांत कांदा उत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले.

केंद्राचे कांदा निर्यातीचे धोरण धरसोड वृत्तीचे असल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कुठल्याही अटी शर्तीशिवाय कांद्याची निर्यात खुली करावी. - भारत दिघाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डधुळेनाशिक