Agriculture News : एकीकडे पाणीपातळी (Water Level) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात तापमानात प्रचंड वाढही झाली आहे. परिणामी मार्चपासून पाणीटंचाईला सुरवात होते आहे. या दिवसात उन्हाळी शेती करायला देखील शेतकऱ्यांना पाणी शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी मिळून शेतीसाठीपाणी वाटपाचे सूत्र (Water Distribution Formula) तयार करत मागील काही वर्षांपासून यशस्वीरीत्या शेती करत आहेत.
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पल्यावनपल्ली गावातील हे शेतकरी असून या शेतकऱ्यांनी शेतीसाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. शेतकरीपाणीवाटप सूत्र वापरून हे शेतकरी शेती करत आहेत. यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही आणि पिकांचे उत्पादनही वाढत आहे.
पाणीवाटप सूत्र अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी, शेतकऱ्यांनी एक पाणी वापरकर्ता गट तयार केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी करार केला आहे. ज्या अंतर्गत त्याच्याशी संबंधित कोणताही शेतकरी १० वर्षांपर्यंत नवीन बोअरवेल (Farm Boarwell) बसवू शकत नाही. शेतकऱ्यांच्या या नवीन प्रयोगामुळे परिसरातील भूजल पातळीत चांगली सुधारणा झाली आहे.
१६ शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ
पल्यावनपल्ली गावातील १६ शेतकऱ्यांनी या कल्पनेला सत्यात उतरविले. या गावात ३८ एकर जमिनीवर सामायिक बोअरवेल टाकण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम या शेतकऱ्यांनी पाणी वाटप गट स्थापन केला. सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकी २५०० रुपये दिले आणि नोंदणी केली. सर्व शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपरवर एक करार केला की ते पुढील एक दशक बोअरवेल खोदणार नाहीत. या १६ शेतकऱ्यांपैकी ४ शेतकऱ्यांकडे बोअरवेल आहेत. तर १२ शेतकऱ्यांकडे बोअरवेल नाहीत.
असा केला जुगाड
पल्यावनपल्ली गावात, शेतांना २२०० फूट खोल खड्ड्याने जोडले आहे. या पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्याचा जास्तीत जास्त फायदा खरीप पिकाच्या हंगामात दिसून येतो. खरीप हंगामात, बोअरवेलचे शेतकरी या गटाशी संबंधित शेतकऱ्यांना एका सामायिक पाईपलाईनद्वारे पाणी पुरवतात. पेरणी, फुले येताना किंवा फळधारणा आणि कापणीच्या वेळी त्याला पाणी लागते. त्यावेळी हे पाणी पुरविले जाते.
भूजल पातळीत सुधारणा
पल्यावनपल्ली गावातील शेतकरी पाणीवाटप सूत्राचा अवलंब करून शेती करत आहेत. येथील शेतकरी सांगतात की, पूर्वी शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेती करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे उत्पन्नही कमी झाले. पण आता पाणी वाटपाच्या धोरणामुळे फायदेशीर ठरत आहे. ते म्हणतात की हे शेतीसाठी फायदेशीर आहे. शिवाय भूजल पातळी देखील सुधारत आहे.
Karjmafi : शेतकरी कर्जमाफीविषयी आरबीआयकडून नवे परिपत्रक जाहीर, वाचा सविस्तर