Lokmat Agro >शेतशिवार > Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज

Latest News Farmers will get solar energy pumps, Ajit Pawar's announcement, see how to apply | Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप, अर्थमंत्र्यांची घोषणा, असा करा अर्ज

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा (Power Supply) करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्यके शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊसच पाडण्यात आला. यावेळी अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज Free Light) देणार असल्याची घोषणा देखील केली. यावेळी अर्थ संकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. यात राज्यातील आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत सलुयाचे पवार यांनी सांगितले. 

दरम्यान यापूर्वीच्या फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात देखील अजित पवार यांनी या योजनेबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त केले होते. पीएम कुसुम योजना असेल, रूफ टॉप सोलर योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. असेही सांगण्यात आले होते. तसेच आजच्या अर्थसंकल्पात देखील आठ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सांगितले. तसेच मागीलवेळी देखील हाच आकडा मंत्र्यांनी घोषित केला होता. मात्र राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, हे पाहणे महत्वाचे आहे. 

असा करा अर्ज (वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज ही लिंक वापरून लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून लाभार्थी त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एस.एम.एस. द्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने त्याच्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेऊ शकतो.
लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “फर्म कोटेशन यशस्वी” असेल तर लाभार्थी अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून ऑनलाइन भरणा किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे भरणा करण्यास पात्र आहे.
फर्म कोटेशनच्या ऑनलाइन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट्स, कॅश कार्ड्स, यूपीआय सारखे पर्याय आहेत.
जर अर्जाची स्थिती / भरणा ह्या लिंकवर; लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “भरणा यशस्वी“ असेल तर पुरवठादार बटण सक्रिय केले जाईल व ओटीपी आधारित सिस्टम वापरुन उपलब्ध निवडसूचीतील पुरवठादार निवडता येईल.
पंप पुरवठादार निवडतांना जर कोणताही निवडसूचीतील पुरवठादार उपलब्ध नसल्यास, त्या मंडळासाठी त्या क्षमतेच्या पम्पाची निर्धारित केलेली संख्या शिल्लक नाही, असा संदेश लाभार्थीला दिसेल.


 

 

Web Title: Latest News Farmers will get solar energy pumps, Ajit Pawar's announcement, see how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.