Aadhaar Card Lost : जर तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) हरवले असेल, आणि आधार नंबर देखील विसरला असाल, तर चिंता करू नका, अगदी काही वेळात तुम्ही तुमचे आधार कार्ड शोधू शकता. यासाठी तुम्हाला केवळ नाव टाकून तुमचा आधार कार्ड नंबर (Aadhaar Card Number) मिळवता यईल. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या करू शकता. तर जाणून घेऊया या सोप्या स्टेपमधून.....
जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया
- सर्व प्रथम आधार कार्डच्या या https://uidai.gov.in/en/ या अधिकृत वरती वेबसाईटवर जायचे आहे.
- या ठिकाणी My Aadhaar हा पर्याय दिसेल. यात अनेक पर्याय दिसतील, यातील Aadhaar Services यावर क्लिक करा.
- यानंतर Retrieve lost or forgotten EID/UID या पर्यायावर क्लिक करा.
- आता नवीन विंडो ओपन होईल, यात दोन पर्याय दिसतील, एक आधार यूआयडी, दूसरा Enrolment ID Number दिसेल.
- यातील आधार यूआयडीवर क्लिक करा. खालील पर्यायात तुमचे टाकायचे आहे. (जे तुमच्या आधार कार्डवर असेल ते)
- त्यानंतर खालच्या रकान्यात मोबाइल नंबर टाकायचा आहे, जो आधार कार्डला लिंक आहे तो.
- यानंतर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन कोड किंवा कॅप्चा आहे, तो टाकायचा आहे. आणि सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
- लागलीच तुमच्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी येतो. सहा अंकी ओटीपी आल्यानंतर खाली दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे.
- हा ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- शेवटी युआयडी नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवल्याचा मॅसेज येईल.
- अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.
हेही वाचा : Aadhar Card Center : आधार कार्ड सेंटर सुरु करायचंय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया