Join us

Sericulture Farming : रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची 'ही' पाच कारणे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 7:42 PM

Reshim Sheti : रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याची बाब पुढे आली आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची निवड करण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना यश मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यातून जिल्ह्यामध्ये रेशीम लागवडीसाठी (reshim Sheti) शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६४० एकरांवर रेशीम लागवड झाली. आतापर्यंत ८५० एकरांवर रेशीम लागवड करण्यात आली आहे. यावर्षी ४०० एकरांवर लागवड होण्याची शक्यता आहे.

दोन लाखांचे उत्पन्नरेशीम लागवडीसाठी (Sericulture Farm) काही तालुक्यांचाच पुढाकार राहिला आहे. यामध्ये उमरखेड, महागाव, पुसद आणि आर्णी या चार तालुक्यांचा समावेश आहे. इतर तालुक्यातही रेशीम लागवडीचे प्रमाण वाढत आहे. नेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चार बॅचचे उत्पादन रेशीम कोष विकून घेतले. त्यांना वर्षभरात दोन लाखांचे उत्पादन मिळाले आहे. यासोबतच कमीत कमी एक लाखाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.

रेशीम कोष उत्पादन व्यवसाय का?शेतीला उत्कृष्ट जोडधंदा.अल्प कालावधीत हाती येणारे पीक.एकवेळेस लागवड केल्यानंतर १० ते १५ वर्षे लागवडीची आवश्यकता नाही.तुती फांद्या व अव्याच्या विष्ठेपासून उत्तम सेंद्रिय खत.पर्यावरणपूरक व्यवसाय.

बाजारपेठ कुठे? रेशीम कोष विकण्यासाठी बडनेरा, जालना, पूर्णा, बीड आणि बारामती या प्रमुख ठिकाणची बाजारपेठ यवतमाळसाठी अतिशय योग्य मानली जाते. या ठिकाणी उत्पादित रेशीम कोष विक्रीसाठी जातो. यावर्षी या रेशीम कोषाला ५०० ते ६०० रूपये किलोचा दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता रेशीम शेती करून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. रेशीम शेतीतून शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचा पैसा पडत असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात रेशीम शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत. 

पट्टा पध्दती आणि अनुदान तुती लागवड फायदेशीर होण्यासाठी तुतीची लागवड पट्टा पध्दतीने करावी. दोन बाय पाच फुट अंतरावर हे वृक्ष लावता येते. तुती क्षेत्रात प्रति एकर आठ मेट्रिक टन शेणखताची आवश्यकता आहे. एका एकरासाठी पहिल्या वर्षी २०० अंडी पुंजाची दोन पिके घेता येतात. तर अनुदानाबत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी तुती लागवड ५४०००  रुपये, ठिबक सिंचन संच ५४०००,  कीटक संगोपन गृह बांधकाम २ लाख ९२ हजार ५००, कीटक संगोपन साहित्य ४५००० रुपये, निर्जंतुकीकरण ४५०० रुपये असे एक एकरासाठी अनुदान आहे. 

टॅग्स :शेतीरेशीमशेतीशेती क्षेत्रयवतमाळ