Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर 

Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर 

Latest News Follow up with Center to cancel GST on Raisins, read details  | Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर 

Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर 

Agriculture News : बेदाण्यावरील ५ टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

Agriculture News : बेदाण्यावरील ५ टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : द्राक्षापासून  (Grape)तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच बेदाण्यावरील ५ टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र देण्यात येईल,  अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राज्यातील द्राक्ष बागायतदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, द्राक्षापासून बेदाणा तयार होताना कुठलीही यांत्रिकी पद्धत वापरली जात नाही. केवळ सूर्यप्रकाशात वाळवून बेदाणा तयार होतो. त्यामुळे बेदाणा प्रक्रियायुक्त पदार्थ नसल्याने हळद आणि गुळाप्रमाणेच त्याचा समावेशही शेतीमाल म्हणून होणे आवश्यक आहे. 

त्यादृष्टीने नाबार्ड व अन्य संबंधीत यंत्रणांची बैठक आयोजित करुन बेदाण्याला शेतीमालाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात यावा. हा निर्णय झाल्यानंतर बेदाण्याला शेतीमाल म्हणून जीएसटीतून सवलत, अवेळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई, शेतीमाल म्हणून विविध संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणे सोपे होईल. त्यामुळे बेदाण्याचा समावेश शेतीमालाच्या यादीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणीसंदर्भात आवश्यक पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी कौन्सिलकडे त्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठविण्यात येईल तसेच त्याच्या मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. नाशिक येथील बेदाणा क्लस्टरसाठी जिल्हा उद्योग केंद्राने घातलेल्या अटी शिथिल करण्याबाबत उद्योग विभागाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Web Title: Latest News Follow up with Center to cancel GST on Raisins, read details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.