Lokmat Agro >शेतशिवार > Gahu Sathvanuk : गहू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा, वाचा सविस्तर 

Gahu Sathvanuk : गहू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा, वाचा सविस्तर 

Latest News Gahu Sathavnuk To preserve wheat for a long time, definitely try these tips, read in detail | Gahu Sathvanuk : गहू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा, वाचा सविस्तर 

Gahu Sathvanuk : गहू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा, वाचा सविस्तर 

Gahu Sathvanuk : कृषी विभागाने (Krushi Vibhag) गहू साठवताना काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला आहे. 

Gahu Sathvanuk : कृषी विभागाने (Krushi Vibhag) गहू साठवताना काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Sathvanuk : देशातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये गव्हाची कापणी (Wheat Harvesting) पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी कापणी अजूनही चालू आहे. शेतकऱ्यांनी गहू घरात साठवण्यास सुरुवात केली आहे, परंतु अनेक वेळा असे दिसून आले आहे की, शेतकरी गहू साठवताना अनेक चुका करतात. ज्यामुळे पीक खराब होते. हे लक्षात घेऊन, कृषी विभागाने (Krushi Vibhag) गहू साठवताना काय काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला आहे. 

शेतकऱ्यांनी गहू अशा प्रकारे साठवावा
गहू साठवण्यापूर्वी, सुरवातीला चांगले वाळवून घ्या. शिवाय साठवण्याची जागा (Wheat Store) किंवा कोठार स्वच्छ करा. धान्यांमधील ओलावा १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. जर साठवण्याच्या जागी किंवा आजूबाजूला भेगा असतील तर त्या भरून दुरुस्त करा. पोत्यांवर ५ टक्के कडुलिंबाच्या तेलाच्या द्रावणाने प्रक्रिया करा. गहू उन्हात वाळवा, जेणेकरून कीटकांची अंडी, अळ्या आणि इतर रोग नष्ट होतील. शेतकऱ्यांना कापणी केलेली पिके आणि धान्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कापणी केलेल्या गव्हाची अशी काळजी घ्या
या हंगामात तयार झालेले गहू पीक काढणे उचित आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावीत, अन्यथा जोरदार वारे किंवा वादळात नुकसान होण्याची शक्यता असते. गव्हाची मळणी केल्यानंतर, साठवण्यापूर्वी धान्य चांगले वाळवा.

या आठवड्यात शेतात हे काम करा.
जर रब्बी पिकाची कापणी झाली असेल तर शेत नांगरून घ्या. यात चाऱ्यासाठी विविध पिकांची लागवड करता येईल. पेरणीच्या वेळी शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांना उभ्या पिकांना आणि भाज्यांना आवश्यकतेनुसार हलके सिंचन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी वाऱ्याचा वेग कमी असताना पाणी द्या.

Web Title: Latest News Gahu Sathavnuk To preserve wheat for a long time, definitely try these tips, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.