Lokmat Agro >शेतशिवार > Gavar Farming : गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी 

Gavar Farming : गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी 

Latest News gavar farming These varieties give high yields for guar farming, buy seeds from here | Gavar Farming : गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी 

Gavar Farming : गवार शेतीसाठी हे वाण भरघोस उत्पन्न देणारे, येथून करा बियाण्यांची खरेदी 

Gavar Farming : कडधान्य पिकांमध्ये, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांच्या यादीत गवारचे (Cluster bean) नाव येते.

Gavar Farming : कडधान्य पिकांमध्ये, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांच्या यादीत गवारचे (Cluster bean) नाव येते.

शेअर :

Join us
Join usNext

Gavar Farming : कडधान्य पिकांमध्ये, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांच्या यादीत गवारचे (Cluster bean) नाव येते. हे कमी खर्चाचे पीक देखील मानले जाते. कारण त्याच्या लागवडीसाठी वेगळे खत आणि पाणी आवश्यक नसते. कमी पाण्यात आणि कोरड्या भागातही ते तितकेच चांगले उत्पादन देते.

जनावरांच्या चाऱ्यासाठी (Animal Fodder) देखील त्याची लागवड केली जाते. त्याचबरोबर शेतकरी त्याची लागवड करून चांगला नफा देखील मिळवू शकतात. जर तुम्हालाही गवारची लागवड करायची असेल. तर गवारच्या सुधारित जातीमध्ये (Gavar Seed) कोहिनूर ५१-आययूएस-५०० हे सर्वात बेस्ट वाण आहे. या वाणाच्या बियाण्यांची विक्री राष्ट्रीय  महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु आहे. 

येथून गवार बियाणे खरेदी करा.
सध्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर मोठ्या प्रमाणात डाळींची लागवड सुरू केली आहे. शिवाय कडधान्यांना चांगली मागणी असल्याने शेतकरी या पिकांकडे वाळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर जे शेतकरी गवार शेतीसाठी इच्छुक असतील आणि त्यांना बियाण्यांची आवश्यकता असल्यास शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, राष्ट्रीय बियाणे महामंडळ गवार बियाणे ऑनलाइन विकत आहे. एनएससीच्या ऑनलाइन स्टोअरमधून हे बियाणे खरेदी करू शकता. शिवाय तुम्ही ते ऑनलाइन ऑर्डर करून ते घरपर्यंत येईल. 

गवारच्या या जातीची वैशिष्ट्ये
कोहिनूर ५१-आययूएस-५०० या बीन्सच्या जातीचे फळ हिरव्या रंगाचे असते. त्याची फळे इतर जातींपेक्षा लांब असतात. या वाणांची पहिली कापणी बियाणे लावल्यानंतर ५०-६० दिवसांत सुरू होते. त्याच वेळी, ही जात ९० ते १०० दिवसांत पूर्णपणे तयार होते. शेतकरी रब्बी, खरीप आणि उन्हाळ या तिन्ही हंगामात गवारची शेती करू शकतात.

एवढ्या किमतीत बीन्स बियाणे खरेदी करा
जर तुम्हाला कोहिनूर ५१-आययूएस-५०० या प्रकारच्या बीन्सची लागवड करायची असेल, तर या प्रकारच्या बियाण्यांचे ५०० ग्रॅम पॅकेट सध्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या वेबसाइटवर ५५० रुपयांना ४२ टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. हे खरेदी करून तुम्ही गवारची फायदेशीर शेती करू शकता.

 

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत कंपनी बदलता येते का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News gavar farming These varieties give high yields for guar farming, buy seeds from here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.