Join us

Agriculture News : डाळिंब लागवडीसाठी सलग तीन वर्ष अनुदान मिळतयं, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 2:25 PM

Agriculture News : शेतकऱ्यांनी फळपिकांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

धुळे :महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (Rojgar Hami Yojna) जॉबकार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसुचित जाती जमातीचे शेतकरी ज्याच्याकडे फळबाग लागवडीकरीता दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत अनुदान पात्र आहेत. फळबाग लागवडीकडे (Fruit Farming) शेतकरी वळाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी इतर पिकांपेक्षा डाळींबाला प्राधान्य दिले आहे. यातून पारंपारीक पिकांपेक्षा अधिकचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झाले आहेत.

असे देण्यात येते अनुदानभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड (Fruit farming Scheme) योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के असे तीन वर्षात अनुदान देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९० टक्के, तर कोरडवाहू झाडांसाठी ८० टक्के ठेवणे आवश्यक आहे. स्वखर्चाने झाडे आणून जीवंत ठेवल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना अनदान देण्यात येते.

ही लागतात कागदपत्रेभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याच्या सातबारा उतारा, ८ अ उतारा, सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदाराच्या सहमती पत्र सादर करावे लागते. त्याचबरोबर आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, माती परिक्षण अहवाल या कागदपत्रांसोबत अपलोड करावा लागतो.

या फळपिकांचा समावेशभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत आंबा, काजू, पेरु, डाळींब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्री, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच. जांभूळ, फणस, अंजिर, चिकू, अशा एकूण १६ फळ पिकांचा समावेश या योजनेतंर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकांकडे कानाडोळा करुन फळपिकांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.. 

टॅग्स :शेतीफळेडाळिंबशेती क्षेत्रधुळे