कांदा निर्यात खुली झाली असून आता सुरळीतपणे वाहतूक सुरु आहे. केंद्र सरकार ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून संबंधित कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनविण्यात आला आहे, त्याचा येथील द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पीएम नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. पीएम म्हणाले की, नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो. आमच्या सरकारने कांद्याचा बफर स्टॉक ठेवण्याचे काम केले. आम्ही मागील वर्षी ७ लक्ष मेट्रिक टॅन कांदा खरेदी केला. यंदा पुन्हा ०५ लाख मेट्रिक टॅन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे.
मागील दहा वर्षांत ३५ टक्के कांदा निर्यात वाढली आहे... दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली करण्यात आली. या दहा दिवसात २२ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून ऑपरेशन ग्रीन सुरु करण्यात आला असून त्यानुसार कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनविण्यात आला आहे, त्याचा येथील द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदी यांनी सांगितले.
पीएम नेमकं काय म्हणाले?
नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो.
सरकारने मागील वर्षी ७ लक्ष मेट्रिक टॅन कांदा खरेदी केला.
यंदा पुन्हा ०५ लाख मेट्रिक टॅन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे.
मागील दहा वर्षांत ३५ टक्के कांदा निर्यात वाढली आहे..
दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली करण्यात आली. या दहा दिवसात २२ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे.
ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे.
PM In Nashik : आज पीएम नाशिकमध्ये, सकाळी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर