Grape Crop Cover : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (National Grape Research Center) केंद्रात थॉम्पसन सीडलेस या वाणात तीन वर्षे केलेल्या अभ्यासानुसार त्याचा वापर अनुकूल असल्याचे आढळले आहे. त्यानुसार ऑक्टोबर छाटणी केल्यावर मण्यात पाणी उतरल्यानंतर ते काढणीपर्यंत प्लॅस्टिक क्रॉप कव्हरचा (Grape Crop Cover) वापर फायदेशीर ठरतो. द्राक्ष बागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादनांचा वापराने काय फायदा होतो, हे जाणून घेऊया....
प्लॅस्टिक आच्छादनाचे फायदे
- फुलगळ, घडकुज व केवडा रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण केले जाते.
- हे आच्छादन द्राक्षवेलींचे भाग (ओलांडे, खोड आणि काड्या) यांचे गारांपासून नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
- बिगरहंगामी पावसामुळे मणी फुटण्याच्या घटना कमी करते.
- वेलींच्या वाढीवर तापमानाचा प्रभाव कमी होतो.
- फळछाटणीच्या हंगामात आच्छादनाखालील पानांमधून बाष्पोत्सर्जन कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची गरज कमी होते.
- चांगल्या प्रतीचे द्राक्ष उत्पादन मिळते.
- मणी कुरकुरीत व दर्जेदार तयार होण्यात मदत होते.
- पानांच्या आकारात वाढ होते. त्यामुळे अन्न तयार करण्याची क्षमता वाढते.
- सूर्यापासून येणारी अतिनिल किरणे फिल्टर होऊन आत जातात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय सेवा केंद्र इगतपुरी