गडचिरोली : यंदा चांगले पर्जन्य आणि पोषक वातावरणामुळे धान पिकावर रोगाचा (Paddy Farming) प्रादुर्भाव कमी होता. धान पीक तर चांगले आहेतच, शिवाय या वर्षात चांगल्या पावसाचा परिणाम भुईमूग आणि कडधान्य पिकेही जोमात आहेत. आरमोरी तालुक्यात यंदा २७५ हेक्टरवर भुईमूग पिकाची लागवड (Groundnut Farming) करण्यात आली आहे.
सध्या भुईमूग पीक (Bhuimug Lagvad) डौलात आहे. जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, धानोरा व देसाईगंज तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी, वैलोचना, गाढवी, सती नदीच्या काठाला मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. या नदीकाठाचा भाग वाळूमिश्रित चिकन मातीचा असल्याने भुईमूग पिकाला पोषक आहे. आता जिल्ह्यात चार-पाच तालुक्यात भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढले आहे. भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाते. भुईमूग पिकामुळे आता शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढली आहे.
बाजारातील या तेलवर्गीय पिकाला चांगली मागणी असल्याने बहुतांश शेतकरी भुईमूग या पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यात रब्बीचा धान पिकाचा पेरा वाढल्याने आता कडधान्य मुग, उडीद, गहू, हरभरा, वाटाणा या पिकाचे क्षेत्र कमी होऊन आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रब्बीच्या धान पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कडधान्य पीक कमी होत आहेत पण भुईमूग पिकाचा पेरा दिवसेंदिवस वाढत आहे. आरमोरी तालुक्यातील (Gadchiroli) शेतकरी धान पिकासोबतच विविध पिके घेतात.
धान पिक हाती आलेल्या शेतात मशागती करून रब्बीच्या पेरणीत शेतकरी व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी रब्बीची पेरणीही अंतिम टप्प्यात आली आहे. धानपीक हाती आल्यानंतर अनेकांनी शेतात हरभरा पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणी ही पेरणी अंतिम टप्प्यात आहे. गत महिनाभरापासून शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे.
यावर्षी परतीचा पाऊस एक महिना लांबल्याने जमिनीतील पाण्याचा निचरा लवकर झाला नसल्यामुळे मशागती करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचा वेळ लागला. सध्या जमिनीत ओलावा असल्यामुळे रब्बीची पेरणी काही ठिकाणी पूर्ण, तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आली आहे. यातून शेतमजुरांना रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : केशर आंब्याच्या बागेत भुईमूग लागवड; केंद्रेवाडी येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग !