नाशिक : आज दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव परिसरातील शेतात सुखोई विमान कोसळले. या अपघातानंतर येथील शेतकऱ्यांचे टोमॅटो लागवडीसाठी तयार शेत तसेच कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर पाईपलाईन आणि विहिरीची पडझड झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
निफाड तालुक्यातील येथील एच ए एल लढाऊ विमानाच्या कारखान्यातील जेट विमान हे 4 रोजी दुपारी 1 वाजेच्या एका शेतात कोसळले. सुदैवाने याअपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वायुसेना दलाचा एक जवान जखमी झाला असल्याचे समजते. सदरचे विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाची लढाऊ विमान असल्याचे समजते. ओझर, कसबे सुकेणे, कोकणगाव शिवारातुन हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील ज्ञानेश्वर मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले पडले.
दरम्यान शिरसगाव येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतात हे विमान कोसळल्याने शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड करण्यासाठी शेत तयार केले होते. याच शेतात हे विमान कोसळल्याने मोठं नुकसान झाले आहे. तसेच विमानाचा काही भाग बाजूलाच असलेल्या कोबीच्या शेतात पडल्याने कोबी पिकाचेही अतोनात नुकसान झाल्याचे मोरे यांनी सांगितले. विमानाचे सर्व अवशेष मोरे यांच्या तीन एकर जमिनीच्या वेगवेगळ्या भागात विखुरले गेल्याने तीन एकर क्षेत्रावरील टोमॅटो लागवड करण्यासाठी तयार केलेलं शेत, विहीर, विजेचे खांब, पाण्याची पाईपलाईन, कोबी पीक याचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन्ही पायलट सुरक्षित
सदरचा विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. यावेळी पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आला आहे. त्यामुळे दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे समजते. या अपघातानंतर घटनास्थळी एच ए एल कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली . तसेच आग विझवण्यासाठी ओझर टाऊनशिप ओझर व पिंपळगाव येथील बंब दाखल झाले होते. तर विमान पाहण्यासाठी शिरसगाव, कोकणगाव, कसबे सुकेने, ओझर, पिंपळगाव, भाऊसाहेबनगर, वडाळी नजीकच्या नागरिकांनी गर्दी केली होती.