Join us

Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 8:24 PM

Harbhara Seed : परभणी विद्यापीठाने विकसित केलेले नवीन हरभरा वाण (Gram Seed) परभणी चना-१६ हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

Harbhara Seed : रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ देखील सज्ज झाले आहे. या विद्यापीठाने विकसित केलेले नवीन हरभरा वाण (Gram Seed) परभणी चना-१६ हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विद्यापिठातील बियाणे विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. 

रब्बी हंगामाला सुरवात झाली असून शेतकरी हरभरा, गहू अधिक प्राधान्य देत असतात. तर विद्यापीठाने (VNMKV) विकसित केलेला हरभरा परभणी चना-१६ या वाणाचा भारताच्या राजपत्रात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या वाणाचा प्रसार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हा वाण विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विद्यापीठाने आवाहन केलंय की, सर्व शेतकरी बीजोत्पादक कंपनी / शेतकरी बीजोत्पादक गट यांना कळविण्यात येते कि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार वनामकृवि, परभणी या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या हरभरा पिकाचे नवीन वाण परभणी चना-१६ (Parbhani Chana 16) या वाणाचा प्रसार महाराष्ट्र राज्य व मराठवाडा विभागातील सर्व शेतकरी बांधव यांच्यापर्यंत व्हावा, याकरिता सदरील वाणांचे ०१ किलो बियाणे प्रायोगिक तत्वावर देण्याचे ठरविले आहे. 

त्यामुळे सर्वाना विनंती करण्यात येते कि, ज्यांना सदरील वाणांचे बियाणे प्रायोगिक तत्वावर पाहिजे असल्यास त्यांच्या करिता सदरील वाणाचे बियाणे हे बीज प्रक्रिया केंद्र, परभणी येथे रु १०० रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे. 

अधिक माहितीसाठी यांचेकडे संपर्क साधावा...डॉ एस. ए. शिंदे, प्रभारी अधिकारी, बीज प्रक्रिया केंद्र, परभणी (मोबाईल नं.९५११८८४१९७)डॉ ए. एम. मिसाळ, सहाय्यक पैदासकार, क्यूएसपी युनिट, परभणी (मोबाईल नं.७५८८६१२९४३)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपरभणीरब्बी