Lokmat Agro >शेतशिवार > Healthy Guava : फळ एक उपयोग अनेक, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे माहितीय का?

Healthy Guava : फळ एक उपयोग अनेक, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे माहितीय का?

Latest News Healthy Guava One fruit has many uses, do you know benefits of eating guava in winter | Healthy Guava : फळ एक उपयोग अनेक, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे माहितीय का?

Healthy Guava : फळ एक उपयोग अनेक, हिवाळ्यात पेरू खाण्याचे फायदे माहितीय का?

Healthy Guava : हिवाळ्यात आहारावर विशेष भर असतो. त्यातही फळे कोणती खावीत, हेही महत्वाचे असते.

Healthy Guava : हिवाळ्यात आहारावर विशेष भर असतो. त्यातही फळे कोणती खावीत, हेही महत्वाचे असते.

शेअर :

Join us
Join usNext

Healthy Guava :  ऋतुमानानुसार आरोग्याकरिता आवश्यक फळे खाण्याचा (Benefits Of Guava) सल्ला तज्ज्ञ देतात. थंडीच्या दिवसांत बाजारात पेरू सहज मिळतात. पेरुमध्ये अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्व-सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.

दररोज पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे हिवाळ्यात पेरू खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी

वजन कमी करायचे असेल तर पेरू हे उत्तम फळ आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. पेरू खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्याकरिताही पेरु खावेत, दररोज पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दिवसभर भूक लागत नसेल तर भाजलेला पेरू खाण्यास सुरुवात करावी. भाजलेला पेरु खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते.

मधुमेहावर उपाय 
पेरू रक्तातील ठेवण्यासाठी गुणकारी आहे. साखर नियंत्रणात अत्यंत पेरुच्या पानांचा अर्क रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. जेवल्यानंतर पेरुच्या पानांचा चहा घेतल्याने साखर नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी पेरू खाणे फायदेशीर ठरते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर परिणामकारक
हिवाळ्यात कफचा अनेकांना त्रास होतो. अशावेळी तुम्ही भाजलेला पेरू खायला हवा. भाजलेल्या पेरूने कफ पातळ होतो आणि बाहेर पडण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भाजलेला पेरू खावा, पेरूच्या सेवनाने कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर भाजलेल्या पेरूचे सेवन करणे फायद्याचे ठरते. भाजलेल्या पेरूमुळे मलनि-स्सारण सुरळीत होते, असेही सांगितले जाते. 

संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी
विज्ञान असेही मानते की पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चार पट जास्त व्हिटॅमिन-सी असते, त्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या व्हायरल आजारांपासून संरक्षण मिळते. पेरुमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. जीवनसत्त्व, मिनरल्स यांनी समृद्ध असलेले पेरू खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. रक्तातील साखरेचे प्रमाणही योग्य तेवढेच राहते. लठ्ठपणा कमी होतो.

पेरूमध्ये भरपूर खनिजे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. पेरूची पाने व्हिटॅमिन-सी आणि लोहाचा उत्तम स्त्रोत आहेत. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी पेरू प्रभावी ठरतो. मात्र, सर्दी-खोकल्यादरम्यान जास्त पिकलेले पेरू खाणे टाळावे. 
- डॉ. अपर्णा खोब्रागडे, आयुर्वेदाचार्य 

All Spice Tree : एकाच झाडाच्या पानामध्ये अनेक मसाल्यांचा स्वाद, जाणून घ्या ऑलस्पाईसबद्दल...

Web Title: Latest News Healthy Guava One fruit has many uses, do you know benefits of eating guava in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.