Join us

Honey Bees : मधमाशांचे विविध प्रकार व प्रजाती, पाळता येणाऱ्या मधमाशा कोणत्या? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 3:58 PM

आग्या माशी, फुलोरा माशी, सातेरी माशी, मेलीफेरा माशी, कोथी माशी हे मधमाशांचे प्रकार सर्वज्ञात आहेत.

आपण मधमाशांचा इतिहास आग्या माशी, फुलोरा माशी,  सातेरी माशी आणि मेलीफेरा माशी हे मधमाशांचे प्रकार सर्वज्ञात आहेत. समजून घेतला. त्यानंतर हळूहळू मधमाशांच्या बाबतीत अनेक वर्षांच्या संशोधनानंतर मधमाशांचे प्रकार, प्रजाती इत्यादींबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली. त्यानुसार आजच्या घडीला जगभरात मधमाशांच्या असंख्य प्रजाती असून त्यापैकी पाच महत्वपूर्ण मानल्या जातात. यात हे पाच प्रकार आज समजून घेऊयात. 

एपिस डॉर्‌सॅटा आग्या माशी : या जातीच्या मधमाशा या उजेडात राहणे पसंत करतात. त्यामुळे या माशांना लाकडी पेट्यांमध्ये पाळता येत नाही. या माशांचा स्वभाव हा अतिशय चिडखोर असतो. या मधमाशा उंच इमारतींवर, शेतातील झाडांवर, उंच धरणावर, डोंगरांवर, बोगद्यात, वडाच्या झाडावर, दगडाच्या फटीत  राहणे पसंत करतात. भारतामध्ये आढळणाऱ्या मधमाशांपैकी आकाराने सगळ्यात मोठी अशी ही मधमाशी आहे. 

फुलोरी माशी : एपिस फ्लोरिया हे फुलोरी मधमाशीचे शास्त्रीय नाव आहे. हिला “फुलोरी मधमाशी” म्हणूनही ओळखले जाते. उजेडात राहणं पसंत करणारी ही मधमाशी आहे. तसेच ही मधमाशी छोटे पोळ करून राहते. या मधमाशीचा अधिवास हा शेतातील झाडावर, बांधात किंवा झुडपांवर, काट्याच्या कुंपणात पाहायला मिळतो. ही मधमाशी आकाराने लहान असून उघड्या जागेत राहत असल्यामुळे कृत्रिम रित्या बंद पेटीत पाळता येत नाही. त्यामुळे या मधमाशीचे  देखील पालन करता येत नाही. 

एपिस सेरेना इंडिका सातेरी माशी : सातेरी माशी ही सहज पाळता येणारी माशी असून परागीभवना करता अत्यंत उपयुक्त अशी माशी आहे. ही माशी जुन्या झाडाच्या पोखरलेल्या भागात, डोंगराच्या कपारीला, दगडाच्या भिंतीमध्ये, अंधाऱ्या जागेत वास्तव्य करत असते. सातेरी माशी प्रतिवर्षाला पाच ते दहा किलो मध उत्पादित करत असते. एपिस सेरेना इंडिका असं या माशीचे शास्त्रीय नाव आहे. या प्रकारच्या मधमाशा या आकाराने आगे मोहोळाआग्या माशीपेक्षा लहान आणि फुलोरी मधमाशांपेक्षा मोठे असतात. अंधारामध्ये सात ते दहा पोळ एकास एक अशा समांतर बांधत असल्याने त्यांना सातेरी मधमाशा असे म्हटले जाते.

मेलीफेरा माशी : ही मधमाशी पाळता येते. या प्रकारच्या मधमाश्या या अंधाऱ्या जागेत पोळ करून राहणे पसंत करतात. यामुळेच या मधमाशा बंद पेटीमध्ये मधुमक्षिका पालनासाठी वापरल्या जातात. या मधमाशांपासून वर्षाला सरासरी 40 किलोपर्यंत मधाचे उत्पादन मिळू शकते. सातेरी मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. या माशीला स्थलांतराची आवश्यकता असते. यातून परागकण विक्रीचा व्यवसाय करता येऊ शकतो. शिवाय भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील करता येऊ शकतो. तसेच ही मधमाशी वर्षाला 25 ते 40 किलो मधाचे उत्पादन करते. 

ट्रायगोना माशी / कोथी माशी : ही मधमाशी पाळता येते. तसेच ही मधमाशी परागीभवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. झिरो मेंटेनन्सने आपण सांभाळ करू शकतो. विशेषतः आंबा पिकात विशेष प्रभावी म्हणून या मधमाशीचा उपयोग करू शकतो. या मधमाशीची नवीन वसाहत करणे सोपे आहे. ही मधमाशी वर्षाला 250 ते 400 ग्रॅम मध उत्पादित करते.

 

टॅग्स :शेतीनाशिक