Join us

फळांचा निर्यातदार व्हायचंय, पणन मंडळाकडून पाच दिवशीय प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 1:13 PM

पणन मंडळाकडून निर्यात व्यवसायात करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. निर्यात व्यवसायात करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी याच योजनांमधील पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रशिक्षण दिले जाते. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात फलोत्पादन निर्यात कशी करावी, याबाबत सविस्तर मागर्दर्शन करण्यात येते. 

राज्यभरात फलोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत असून यासाठी कृषिमाल निर्यातीसाठी महाराष्ट्र पणन मंडळाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. नवे निर्यातदार घडविणे यांसह कृषिमालाची निर्यातवृद्धी करणे, शेतकऱ्याच्या शेतमालाचे मुल्यवर्धन जपणे, परकीय चलन प्राप्त करणे असे उद्देश या प्रशिक्षणाचे आहेत. तर प्रशिक्षणार्थी सहभागी होण्यासाठी कृषिमालाचे निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्तीना प्राधान्य राहील. तसेच या प्रशिक्षणासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, तसेच कोणतीही किमान पात्रता आवश्यक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

पाच दिवसांच्या प्रशिक्षणात काय? 

दरम्यान या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून प्रत्येक महिन्याचा शेवटचा आठवडा यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्रशिक्षणात मुख्यत्वे ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधी व पणन मंडळाचे कार्य, इनकॉईस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल इ. कागदपत्रांचो तोंड ओळख, प्रमुख पिकांची निर्यातीसाठी गुणवत्ता मानके, कृषिमालाची वाहतूक व पुरवठा यंत्रना (स्थानिक, आंतरदेशीय, आंतरराष्ट्रिय) (SCM), निर्यातीसाठी APEDA, DGFT, MSAMB व शासनाच्या योजना, फळे व भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पद्धती, कृषि क्षेत्रामध्ये ब्रडिंगचे महत्व, बैंकिंग टमिनॉलॉजीज, बैंकिग प्रक्रिया, पेमेंट रिस्क, सुविधा केंद्र गरज (IFC, VHT, HWIT, VPF), उत्पादनांचा अभ्यास, एच. एस. कोड, आंतरराष्ट्रीय परिस्थिती व पणन, करार शेती व पणन कायद्यातील बदलामुळे पणन संधी, निर्यात प्रक्रिया, परवाने, नोंदणी व विमा आदींचा उहापोह असणार आहे.  

प्रशिक्षण शुल्क किती लागणार?

हे प्रशिक्षण पाच दिवसांचा असल्याने या प्रशिक्षणासाठी निवासाची जेवणाची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे सदर उमेदवारांकडून प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येत आहे.  निवासी शुल्क अकरा हजार पाचशे रुपये, अनिवासी शुल्कर 9635 रुपये तर महिलांसाठी 8638 रुपये प्रशिक्षण शुल्क असणार आहे. या प्रशिक्षण शुल्का मध्ये प्रशिक्षण साहित्य पाच दिवस निवास, जेवण, नाश्ता, चहा इत्यादी खर्चाचा अंतर्भाव असणार आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण हे महाराष्ट्र राज्य कृषी प्रधानमंडळ पुणे येथे असणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीफलोत्पादनशेतकरी