Lokmat Agro >शेतशिवार > Honey Bee : मधुमक्षिका पालन कसे केले जाते? त्याचे फायदे काय? 

Honey Bee : मधुमक्षिका पालन कसे केले जाते? त्याचे फायदे काय? 

Latest News How is honey beekeeping done? What are its benefits? | Honey Bee : मधुमक्षिका पालन कसे केले जाते? त्याचे फायदे काय? 

Honey Bee : मधुमक्षिका पालन कसे केले जाते? त्याचे फायदे काय? 

मधुमक्षिका पालन करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात घेऊया... 

मधुमक्षिका पालन करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात घेऊया... 

शेअर :

Join us
Join usNext

मधुमक्षिका पालनाचे काही प्रकार आपण समजून घेतले. मात्र हे मधुमक्षिका पालन कसे केले जाते? यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे का? मधुमक्षिका पालनाचे फायदे काय? या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मधुमक्षिका पालन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल. त्यामुळे मधुमक्षिका पालन करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात घेऊया... 

मधुमक्षिका पालन हा शेतीला पुरक असा व्यवसाय शेतकऱ्यांना अतिरीक्त उत्पन्न मिळवून देवू शकतो. मधमाशा अन्नाची गरज भागविण्यासाठी प्रत्यक्षपणे मधाच्या रूपाने आणि अप्रत्यक्षपणे पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचनाचे फार महत्वाची मदत करतात. सद्यस्थितीत मधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्रआहे. मध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरत आहे. मधमाशा पालन करतांना योग्य नियोजन केले तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकते. रोजगार निर्मीतीला वाव असल्याने हा उद्योग पुरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 

मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक बाबी.

मधमाशांच्या पाळता येणाऱ्या जातीची योग्य निवड.
मधमाशांना उपयुक्त पराग, मकरंद देणाऱ्या वनस्पतींची
मुबलक उपलब्धता व त्यांच्या फुलोऱ्याचे सातत्य,
मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक तंत्राचे प्रशिक्षण,
मध आणि मेण विक्रीसाठी बाजारपेठेच्ची जवळ उपलब्धता,
मधपेट्या आणि मधयंत्र यांचा मागणीनुसार पुरवठा आणि त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान. 

मधुमक्षिका पालन करण्यासाठी शास्रोक्त प्रशिक्षण गरजेचे असते. या प्रशिक्षणामध्ये मधुमक्षिकाच्या जाती कोणत्या? आपल्या भागासाठी कोणती जात निवडावी?एका पेटी पासून दोन पेट्या तयार करता येतील का? त्याचा हँडलिंग कसं करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या प्रशिक्षणातून मिळतात. 

मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य

पोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरून त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.

मधमाशा पालनाचे फायदे 

मध आणि मेणाचे उत्पादन.
औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये मध आणि मेणाचा उपयोग.
रॉयल जेलीचे उत्पादन. परागीभवनाद्वारे पिकांच्या आणि फुलांच्या उत्पादनात भरीव वाढ व निसर्गाचे संतुलन व संवर्धन होते.
 

Web Title: Latest News How is honey beekeeping done? What are its benefits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.