Lokmat Agro >शेतशिवार > Kharip Season : नाशिक जिल्हयात खते व बियाणे किती उपलब्ध? इथं वाचा सविस्तर 

Kharip Season : नाशिक जिल्हयात खते व बियाणे किती उपलब्ध? इथं वाचा सविस्तर 

Latest News How much fertilizers and seeds are available in Nashik district? see details | Kharip Season : नाशिक जिल्हयात खते व बियाणे किती उपलब्ध? इथं वाचा सविस्तर 

Kharip Season : नाशिक जिल्हयात खते व बियाणे किती उपलब्ध? इथं वाचा सविस्तर 

Nashik : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हयात (Nashik District) खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे.

Nashik : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हयात (Nashik District) खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगाम २०२४ (Kharip Season) करिता शासनाकडुन युरीया, डिएपी, एमओगी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकुण २.२१ लाख मे.टन खतांचे आवंटन नाशिक जिल्हयासाठी मंजूर करण्यात आले आहे. माहे २७ मे २०२४ अखेर जिल्हयात युरीया खत (Urea) ५५३७२ मे.टन, डीएपी १९९५१ मे.टन, एमओपी २३६१, एसएसपी १३९५८ मे.टन व संयुक्त खते ८३३८६ मे.टन असे एकूण १ लाख ६७ हजार ०२८ मे.टन खत उपलब्ध आहे. 

नाशिक जिल्हयातील (Nashik District) किरकोळ खत विक्रेत्यांकडे दैनदिन उपलब्ध असलेल्या रासायनिक खर्ताची माहिती कृषिक या माबाईल अॅपवर चावडी या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयाकरीता कापुस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मूग व उडीद, इ. पिकांचे मागणीनुसार पुरवठा सुरु झाला आहे. जिल्हयात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे. तसेच कृषि निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्याकडुन निविष्ठा खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सिल अथवा मोहरबंद पाकिटे पिशव्या बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरील अंतीम मुदत पाहूण घ्यावी.

 तक्रारींसाठी संपर्क 
 
शेतकरी बांधवांनी परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातुनच व पक्क्या पावतीवरच कृषि निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदो ही e-POS मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्टा व पाकिटावरची छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतीरिक्त इतर निविष्टांची शेतक-यांना सक्ती करणे हे बेकायदेशीर असुन याबाबत कृषि विभागाकार्ड तसेच वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात येत आहे. शेतक-यांनी कृषि निविष्टांबाबत काही तक्रार असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक ७८२१०३२४०८ यावर तसेच जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

भरारी पथकांची नियुक्ती 

नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार, योग्य किमतीत व वेळेत कृषि निविष्ठा मिळण्याकरीता व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागस्तरावर १ जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर १ अशी १७ भरारी पथके कृषि विभागाने स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरावर तसंच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कृषि निविष्ठा बाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कृषि विभागाचे क्षेत्रीय पातळीवर कार्यरत कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषि विस्तार अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकारी तसेच पंचायत ममिनी कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Latest News How much fertilizers and seeds are available in Nashik district? see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.