Join us

Aadhar Card Center : आधार कार्ड सेंटर सुरु करायचंय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 3:55 PM

Aadhar Card Center : नवीन व्यवसाय म्हणून आधार सेंटर सुरु (Aadhar Center) करावयाचे असल्यास हा लेख अत्यंत महत्वाचा असणार आहे.  

Aadhar Card Center : आज अनेक शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी आधार सेंटर (Aadhar Card Center) गाठावं लागतं. त्यामुळे अलीकडच्या वर्षात आधार सेंटरला चांगलीच डिमांड आल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकजण आधार सेंटर सुरु करण्याचा विचारात आहेत, तर त्यांच्यासाठी शिवाय काहींना नवीन व्यवसाय म्हणून आधार सेंटर सुरु करावयाचे असल्यास हा लेख अत्यंत महत्वाचा असणार आहे.  

आधार सेंटर कुणीही चालू करू शकतं. मात्र त्यासाठी आधार कार्ड सेंटरची (Aadhar Card Center Franchise) फ्रँचायजी घ्यावी लागते. शिवाय तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. याशिवाय तुम्ही आधार कार्ड सेंटर सुरू करू शकत नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) परीक्षा आयोजित करण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आधार सर्व्हीस सेंटर (Aadhar Service Center) सुरू करण्यासाठीचा परवाना देण्यात येतो. यात तुम्हाला आधार एनरॉलमेंट आणि बायोमॅट्रीक पडताळणी करण्याची मान्यता संबंधित सेवा केंद्राला मिळते. यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. ही प्रक्रिया पाहुयात... 

हे आहेत टप्पे 

  • सर्वात आधी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाइटला भेट द्या. 
  • त्यानंतर Create New User वर क्लिक करा. तिथं तुम्हाला कोड शेअर करण्यास सांगितलं जाईल. 
  • Share Code साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc या लिंकवर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला XML File आणि Share Code उपलब्ध होईल. 
  • आता अर्ज दाखल करण्याची माहिती देणाऱ्या विंडोवर पुन्हा या आणि फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य पद्धतीनं भरा. 
  • त्यानंतर तुमच्या फोन आणि ई-मेलवर ID आणि Password येईल.
  • User ID आणि password च्या माध्यमातून Aadhaar Testing and Certification या पोर्टलवर लॉगइन करा. 
  • इथं तुम्हाला एक फॉर्म उपलब्ध होईल तो भरा. त्यावर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा. 
  • Proceed to submit form पर्यायवर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावं लागेल. 
  • यासाठी वेबसाईटच्या Menu पर्यायावर क्लिक करा आणि पेमेंट पर्यायावर क्लिक करुन शुल्क भरावं लागेल.
  • सेंटर बुक करण्याची प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन दिवस वाट पाहावी लागेल. 
  • त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर लॉगइन करा आणि Book Center पर्यायावर क्लिक करा. 
  • नजिकचं कोणतंही सेंटर निवडा आणि परीक्षेसाठीचा वेळ, तारीख निवडा. 
  • Admit Card डाऊनलोड करा व ठरलेल्या दिवशी वेळेवर परीक्षेसाठी सेंटरवर पोहोचा.

 

पेपर पास झाल्यावर काय करायचं? परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रँचायजी सुरू करण्याची परवानगी मिळते. यानंतर आधार कार्ड संबधी कामकाज सुरु होते. विशेष म्हणजे याची फ्रँचायजी अगदी मोफत मिळते. मात्र आधार सेंटरचा सेटअप उभा करण्यासाठी आवश्यक बाबी स्वतः कराव्या लागतात. जसे, कार्यालय, संगणक, इंटरनेट आदी व्यवस्था असावी लागते. 

हेही वाचा : Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

टॅग्स :आधार कार्डशेती क्षेत्रशेतीपरीक्षा