Lokmat Agro >शेतशिवार > वैरणीवर युरिया प्रक्रिया कशी करावी?

वैरणीवर युरिया प्रक्रिया कशी करावी?

Latest News How to do urea treatment on fodder | वैरणीवर युरिया प्रक्रिया कशी करावी?

वैरणीवर युरिया प्रक्रिया कशी करावी?

वाळलेल्या वैरणीचा चांगल्या प्रकारे वापर करण्याच्या दृष्टीने वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्यात येते.

वाळलेल्या वैरणीचा चांगल्या प्रकारे वापर करण्याच्या दृष्टीने वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्यात येते.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांची प्रकृती सद्ध राहण्यासाठी दुभत्या जनावरापासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी व कामाचे जनावरापासून चांगल्या प्रकारे काम मिळण्यासाठी त्याच्या शरीराचे समाधानकारक वाढ होण्यासाठी गाइ व म्हशीचा आहार समतोल असणे आवश्यक आहे. यासाठी वाळलेल्या वैरणीचा चांगल्या प्रकारे वापर करण्याच्या दृष्टीने या वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्यात येते. ही युरिया प्रक्रिया कशी करावी, याबाबत माहिती घेऊयात. 

युरिया प्रक्रियेची आवश्यकता का आहे? 

जनावरांची प्रकृती समृद्ध राहण्यासाठी दुभत्या जनावरापासून अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी व कामाचे जनावरापासून चांगल्या प्रकारे काम मिळण्यासाठी त्याच्या शरीराचे समाधानकारक वाढ होण्यासाठी गाई व म्हशीचा आहार समतोल असणे आवश्यक आहे. खरीप हंगाम वगळता जनावरांच्या आहारात हिरव्या वैरणीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामूळे त्यांना भाताचा पेंडा व गव्हाचे काड मोठया प्रमाणात खावू घातले जाते. भाताचा पेंडा व गव्हाचे काड यांची वाळलेली वैरण कठीण व तंतुमय असून त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असते. या वैरणीची पचन नियता व चवही समाधानकारक नसते, अशा प्रकारच्या वैरणीत जनावरांची पोषणद्रव्यांची गरज पूर्णपणे भागवू शकत नसल्याने जनावरांना पशुखाद्यासाख्खा महागडा पूरक आहार द्यावा लागतो. महाराष्ट्राम गव्हाचे काड व भाताचा पेंडा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा उपयोग मोठया योग्य अशा प्रकारच्या वैरणीवर युरियाची प्रक्रिया केल्यास व प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना खावू घातल्यास जनावरांची गरज भागेल तसेच त्यांना प्रथिनेयुक्त चारा उपलबध होइल.

युरिया प्रक्रियेचा वाळलेल्या वैरणीवर होणारा परिणाम.

वाळलेल्या वैरणीवर युरियाची प्रक्रिया केल्यास वैरणीची पचन नियता वाढते. जनावरे जास्त वैरण खातात व वैरणीतील पोषक द्रव्यांचे परिणाम वाढते. वाळलेल्या वैरणीवर प्रक्रिया करण्याकरिता खालीलप्रमाणे साधनांची आवश्यकता असते. 

काय काय साहित्य आवश्यक 

गव्हाचा भुसा /भाताचा पेंडा/बाजरीचे सरमड इ. युरिया प्रति 100 किलो वैरणीस 4 किलो प्रमाणे
प्लॅस्टिकची बादली व 100 लिटर क्षमतेची टाकी
मिश्रण फवारण्यासाठी झारी
लाकडी दाताळे किंवा फावडे
प्लॅस्टिकचा कागद / गोणपाटाचे पोते
7 अर्धा किलो मीठ

युरिया प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी.

प्रक्रियेकरिता सिमेंट कॉक्रेटचा ओठा किंवा सारवलेली स्वच्छ जागा निवडावी
वाळलेली 100 किलो वैरण ओटयावर व्यवस्थित पसरून ठेवावी 4 ते 6 इंच उंचाचा समान थर तयार करावा
प्लॅस्टिकच्या टाकीत 60 ते 65लिटर पाणी घेवून त्यामध्ये 4 किलोग्रॅम युरिया पूर्णपणे विरघळून घ्यावा. 
मोठी 100 लिटरची प्लॅस्टिक टाकी नसल्यास प्लॅस्टिकच्या बादलीत 10 लिटर पाणी घेवून त्यामध्ये 400 ग्रॅम युरिया विरघळून घ्यावा
युरिया व पाण्याचे तयार केलेले निम्मे मिश्रण वाळलेल्या वैरणीवर समप्रमाणात झारीने हळू हळू फवारून घ्यावे.
लाकडी दाताळयांच्या सहाय्याने किंवा हाताने वैरणीचा थर उलटा करावा.
उर्वरित मिश्रणात अर्धा किलो मीठ विरघळून पूर्ण मिश्रण पुन्हा वरील पध्दतीने वैरणीवर फवारून घ्यावा.
प्रक्रिया केलेले वैरणीचा कोप-यात ढीग करावा ढिग करतांना वैरणीच्या थरावर थर देवून भरपूर दाब द्यावा जेणेकरून वैरण घटट दाबून बसेल अशा ढिगाचे पावसापासून रक्षण करणे आवश्यक आहे. 
वैरणीचा ढिग गोणपाटांनी किंवा प्लॅस्टिक कागाच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून ठेवावा पूर्ण चार आठवडे ढिग उघडू नये व हलवू नये
चार आठवडे उबविल्यानंतर वाळलेल्या वैरणीचा रंग पिवळा सोनेरी होवून वैरण खाण्यास योग्य अशी तयार होते

प्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी.

प्रत्येक प्रक्रियेच्या वेळी ताजे मिश्रण तयार करूनच प्रक्रिया करावी. प्रत्येकवेळी प्रक्रिया केल्यानंतर तयार केलेला ढिग भरपूर दाब देवून घटट करावा. घटट नसलेल्या ढिगातील प्रक्रिया केलेली वैरणीवर परिणामकारक प्रक्रिया होत नाही.

प्रक्रिया केलेली वैरण कशी खावू घालावी.

ढिगातील वैरण काढतांना प्रत्येकवेळी समोरच्या बाजेचा आवश्यक तेवढा भाग काढून घेवून पुन्हा ढिग पूर्ववत सरह करून पुरेसा दाब देवून ठेवावा.
प्रक्रिया केलेली वैरण खावू घालण्यापूर्वी सुमारे एक तास पसरून ठेवावी जेणेकरून वैरणीतील अमोनिया वायुचा वास निघून जाइल.
प्रक्रिया केलेल्या वैरणीची अनोखी चव एकदम जनावरांना न आवडल्याने वैरण खात नसतील तर अशी वेरण इतर प्रक्रिया न केलेल्यावेरणीत थोडे थोडे मिसळून जनावरांना खायला घालावे व हळू हळू प्रक्रिया केलेल्या वैरणीचे प्रमाण वाढवावे.
प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना खायला देण्यास सुरवात केल्यानंतर 15 दिवसानी जनावरांचे दुग्धोत्पादन शरीर स्वास्थ व शारीरीक वाढ याबाबत निरिक्षण करावे. प्रक्रिया केलेली वैरण सलग पध्दतीने जनावरांना खायला दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतील. प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना हिरव्या वैरणीबरोबर किंवा कुटटी फक्त प्रक्रिया केलेली वैरण खावू घालता येइल. प्रक्रिया केलेली वैरण दुभत्या, खाट्या, गाभण गाई म्हशींना तसेच सहा महिन्यावरील वासरांना कोणत्याही प्रमाणात खाऊ घालता येईल.
 

Web Title: Latest News How to do urea treatment on fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.