नाशिक : साखर आपल्या दैनंदिन जीवनात अविभाज्य भाग बनलेली आहे. सकाळची सुरवात तर सायंकाळपर्यंत चहापासून ते अनेक पदार्थांच्या माध्यमातून साखर आहारात समाविष्ट करत असतो. पण ही रोजची वापरातील साखर कशी तयार होते? हे समजून घेऊया. साखर तयार करण्याची कारखान्यातील नेमकी प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेऊया.
सद्यस्थितीत उसतोडीचा हंगाम सुरु असून अनेक शेतात ऊसतोड कामगारांच्या मदतीने ऊसतोड सुरु आहे. ऊसतोडीनंतर हा सर्व ऊस ट्रॅक्टर, ट्रक च्यामाध्यमातून कारखान्यापर्यंत पोहचविला जातो. यानंतर खऱ्या अर्थाने उसावर प्रक्रिया सुरु होते. तर शेतातून ऊस ट्रॅक्टर ट्रक द्वारे कारखान्या परत आणला जातो. या ठिकाणी ऊस वाहनांमधून उतरविला जातो. नंतर ऊसाचे वजन केले जाते. यानंतर किकरच्या सहाय्याने उसाची लेव्हल केली जाते. त्यांनतर लेव्हलवर ऊस बारीक केला जातो. फायबर रायजर मध्ये पूर्ण भुगा केला जातो. आणि रोटरी स्किल रस गळून येतो.
यानंतर 33*66 या उल्का मिलमध्ये रस काढला जातो. उल्का मिलनंतर उर्वरित चार मिलमध्ये पुन्हा रस काढण्याचे काम केले जाते. यानंतर एलवेटरच्या माध्यमातून पूर्ण कोरडा भुसा बाहेर पडून थेट बॉयलर जातो. हा भुसा बॉयलरसाठी वापरला जातो. त्यानंतर वेगळा केलेल्या ऊसाच्या रसाची कारखान्यात असलेल्या प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासली जाते, त्यामध्ये कोणतेही विषारी घटक नाहीत याची खात्री केली जाते. प्रयोगशाळेत तपासणी केलेला उच्च प्रतीचा रस पुढे प्रक्रिया हाऊस मध्ये पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो.
साखर उत्पादनाची प्रक्रिया...
यानंतर मुख्य साखर उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. यात वेफर सेल तथा हिटर मध्ये रस उकळला जातो. चार ते पाच वेळा यावर प्रक्रिया केली जाते. यानंतर हाफरच्या माध्यमातून साखर गार केली जाते, तर ग्रेडरच्या माध्यमातून साखरेच्या तीन ग्रेड केल्या जातात. या ठिकाणी सायलो आटोमॅटिक काट्याच्या साहाय्याने 50 किलोचे पोते तयार होते. साधारण एका मिनिटात 13 पोते साखर तयार होते.