Join us

Grape Farming : खरड छाटणी आणि लवकर झालेल्या द्राक्ष बागांचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:08 PM

Grape Management : खरड छाटणी लवकर झालेल्या द्राक्षबागेत (Grape Farming) पाऊस सुरू होईपर्यंत काडी अर्ध्यापर्यंत परिपक्व होणे गरजेचे असते.

Grape Management : खरड छाटणी लवकर झालेल्या द्राक्षबागेत (Grape Farm) पाऊस सुरू होईपर्यंत काडी अर्ध्यापर्यंत परिपक्व होणे गरजेचे असते. काडी अर्ध्यापर्यंत परिपक्व झालेल्या स्थितीत फुटीचा शेंडा जास्त प्रमाणात वाढत नाही. यावेळी बागेत पालाशची उपलब्धता सुरू असल्यामुळेही शेंडावाढ नियंत्रणात असते. वाढत्या आर्द्रतेमुळे शेंडा थोडाफार वाढला तरी यावेळी शेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवता येते.

उशिरा छाटणी Crop Management) झालेल्या बागेत मात्र परिस्थिती वेगळी असेल. येथे काडी कच्ची असून, आताही ती तळातून गुलाबी रंगाची असेल. अशा परिस्थितीत शेंडा वाढ जोमात होईल. कारण या वेलीची शाकीय वाढीची अवस्था अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. फक्त या काड्यांवर बगलफुटीही जास्त जोमात निघत असतील. या वेलीचा आता सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी असू शकतो. बागेत व्यवस्थित सूक्ष्मघड निर्मिती होण्याच्या दृष्टीने काडीच्या प्रत्येक डोळ्यावर सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असेल. 

काय कराल? 

परंतु, या बागेत फुटी जास्त वाढल्यामुळे कॅनोपीमध्ये गर्दी होईल. डोळ्यावर आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळणार नाही. अशा बागेत बगलफुटी काढणे, शेंडा पिंचिंग करणे, संजीवकांचा वापर (६-बीए आणि युरासिल) आणि स्फुरद व पालाशयुक्त खते यांचा वापर या उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. सध्या बागेत पावसाळी दिवस असल्यामुळे आर्द्रता कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गरज असलेल्या काळातच फक्त पाण्याची उपलब्धता करावी, अन्यथा बागेत यावेळी पाण्याची गरज नसेल.

डाळींब मृग बहर (कीड व्यवस्थापन)

नवीन पालवी फुटण्याची अवस्था

एकरी २४ नीळे व पिवळे चिकट सापळे बागेत नागमोडी पद्धतीने झाडाच्या उंचीच्या १५ सें.मी खाली लावावेत.पहिली फवारणी - रसशोषक किडींसाठी, अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मि.ली किंवा वरील दोन्ही एकत्रितपणे प्रत्येकी ३ मि.ली. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी). दुसरी फवारणी - ७ ते १० दिवसांनी रसशोषक किडींसाठी, सायअँट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किंवा थायमिथोक्साम (२५ डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली. प्रतिलिटर पाणी प्रमाणे करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)

संकलन : विभागीय संशोधन केंद्र,  इगतपुरी (हा कृषी सल्ला केवळ नाशिक जिल्ह्यापुरता दिलेला आहे) 

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापननाशिकशेती