Join us

कृषी सहाय्यक लिखित 'मिलेट्स किचन' प्रकाशित, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 4:28 PM

येवला येथील कृषी सहाय्यकाने भरडधान्यांचा लेखाजोखा पुस्तकाच्या रूपात सर्वांसमोर आणला आहे.

नाशिक  : आपल्या अभ्यासाला अनुभवांची जोड देत येवला येथील कृषी सहाय्यकाने भरडधान्यांचा लेखाजोखा पुस्तकाच्या रूपात सर्वांसमोर आणला आहे. मिलेट वर्षात प्रचार प्रसार करत असताना आलेले अनुभव आणि भर धान्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी 'मिलेट्स किचन' नावाचं पुस्तक कृषी सहाय्यक सोनाली कदम यांनी लिहलं आहे. नुकतेच या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. 

गेल्या ११ वर्षांपासून येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथे कृषी सहायक म्हणून सोनाली कदम या कार्यरत आहेत. 'शेती हा फक्त व्यवसाय नाही.. ती जगण्याची रीत आहे', या विचारानुसार काम करत असलेल्या सोनाली कदम यांचा जन्म शेतकरी कुटुंबात जन्म झालेला. म्हणूनच पहिल्यापासून शेती मातीशी निगडित काम त्या करत आलेल्या आहेत. कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असताना मागील वर्ष हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले. त्यालाच भरडधान्य किंवा श्री धान्य म्हणून ही ओळखले जातेय. याच पार्श्वभूमीवर त्यांना मिलेट्सवर जवळून काम करण्याची संधी मिळाली. 

दरम्यान भारतात कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तृणधान्य ची लागवड केली जात होती, परंतु बदलत्या पीक पध्दतीने त्यात घट होत गेली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहारातील महत्व यांची जनजागृती व्हावी, मिशन मिलेट ही मोहीम राबवली गेली. तृणधान्यांचा आहारात वापर करा, असे नेहमीच डॉक्टर्स सांगतात. याबाबत नेहमीच गृहिणी विचारपूस करत असत. या दरम्यान वेगवगेळे अनुभव येत गेले. मग मिलेट्स म्हणजे काय, त्याचा आहारात किती महत्व, ते कसे तयार करावे?  अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोनाली कदम यांनी पुस्तक स्वरूपात मांडण्याचे निश्चित केले. विशेष म्हणजे मराठी भाषेतून मिलेट्स किचन हे पुस्तक सर्वांसमोर आलं आहे. 

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट चर्ष म्ह्णून साजरे करण्यात आले. देशभरात वेगवगेळ्या स्वरूपात कार्यक्रम घेण्यात आले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिलेटचा प्रचार प्रसार करण्यात आला. या उपक्रमाचा भाग होण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत पुस्तकाच्या स्वरूपात लोकांपर्यंत भरड धान्यांची माहिती पोहचवू शकतो, या दृष्टीकोनातून हे पुस्तक साकार झाले. कृषिसहाय्यक म्हणून काम करताना भरड धान्यांची माहिती दिली जायची. पण पाककृती बद्दल माहिती नसायची. यामुळे मराठीमध्ये सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. - सोनाली शेळके कदम, कृषी सहाय्यक, येवला 

ज्या क्षेत्रात काम करतो, त्या बरोबरच भरड धान्याची पाककृती सर्वसामान्यांना माहिती होण्यासाठी सोनाली शेळके यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. याद्वारे मिलेटचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल. शिवाय पुस्तक रूपात असल्याने तरुणांपासून जेष्ठापर्यंत सर्वांना माहितीपर असलेले पुस्तक आहे. - विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी

टॅग्स :शेतीनाशिकशेती क्षेत्रकिचन टिप्स