जळगाव : राज्य शासनाकडून पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना (Fruit Crop Insurance Scheme) राबविण्यात येत असून, या योजनेत मृग बहारातील मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू , सीताफळ या फळ पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जर फळ पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले व जर शेतकऱ्यांनी विमा काढला असेल तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (crop Insurance) मिळू शकणार आहे.
विमा संरक्षण रकमेत वाढ..
यंदा शासनाकडून फळपीक विम्यांतर्गत विमा संरक्षित रकमेत वाढ केली आहे. तर शेतकऱ्यांच्या हिस्स्यातील रक्कम काही फळांसाठी वाढविण्यात आली आहे. तर, काही फळांसाठी मात्र कमी करण्यात आली आहे. मोसंबीसाठी गेल्या वर्षी विमा हप्ता ४ हजार होता. तो आता ५ हजार करण्यात आला आहे. मात्र, विमा संरक्षित रक्कम ८० हजारांवरून १ लाख इतकी करण्यात आली आहे. डाळिंबासाठीचा विमा हप्ता दीड हजार रुपयांनी वाढविण्यात आला असून, ६ हजार ५०० वरुन ८ हजार रुपये करण्यात आला आहे. तर, विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजारावरून १ लाख ६० हजार इतकी करण्यात आली आहे.
पीक विमा भरण्याची काय आहे मुदत..
- पेरू, लिंबू या फळपिकांसाठी २५ जूनपर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे.
- मोसंबी, चिकूसाठी ३० जूनपर्यंत विमा हप्ता शेतकरी भरू शकतात.
- डाळिंबसाठी १४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
- सीताफळसाठी ३१ जुलैपर्यंत विमा हप्ता भरण्याची मुदत आहे.
कोणते शेतकरी भाग घेऊ शकतात-
भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. आधार कार्ड, सात-बारा उतारा, बागेचा जिओ टॅग फोटो ही कागदपत्र आवश्यक आहेत
विमा हप्ता व मिळणारी नुकसानभरपाई
फळपीक - विमा हप्त्याची शेतकऱ्यांच्या हिस्स्यातील रक्कम - मिळणारी नुकसानभरपाई
मोसंबी - ५ हजार - १ लाख
डाळिंब - ८ हजार -१ लाख ६० हजार
लिंबू - ४ हजार - ८० हजार
पेरू - ३ हजार - ७० हजार
सीताफळ - ३५०० - ७० हजार
चिकू - ६३०० - ७०