Lokmat Agro >शेतशिवार > Intercropping In Papai : पपईच्या पिकात झेंडूची लागवड, शहाद्याच्या शेतकऱ्याचा प्रयोग, वाचा सविस्तर 

Intercropping In Papai : पपईच्या पिकात झेंडूची लागवड, शहाद्याच्या शेतकऱ्याचा प्रयोग, वाचा सविस्तर 

Latest News Intercrop Cultivation of marigold in papaya crop, experiment of Shahada farmer, read in detail  | Intercropping In Papai : पपईच्या पिकात झेंडूची लागवड, शहाद्याच्या शेतकऱ्याचा प्रयोग, वाचा सविस्तर 

Intercropping In Papai : पपईच्या पिकात झेंडूची लागवड, शहाद्याच्या शेतकऱ्याचा प्रयोग, वाचा सविस्तर 

Intercropping In Papai : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने आपल्या पपईच्या शेतात आंतरपीक (Intercropping In Papai) म्हणून झेंडू फुलांची लागवड केली आहे.

Intercropping In Papai : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने आपल्या पपईच्या शेतात आंतरपीक (Intercropping In Papai) म्हणून झेंडू फुलांची लागवड केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याने आपल्या पपईच्या शेतात Papaya Crop) आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची Zendu Farming) लागवड केली आहे. या फुलांना दिवाळीत अधिक मागणी होत असून, थेट गुजरात राज्यात यांची विक्री होत आहे. झेंडू फुलातून आताच चांगले उत्पन्न मिळत आहे, यानंतरही उत्पन्न मिळण्याची आशा आहे. 

मागील तीन-चार वर्षे झेंडूच्या फुलांना (Marigold Farming) मागणी नसल्याने उत्पादकांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. शेतकरी देखील झेंडूची लागवड करण्यास धजावत नव्हते. तसेच यंदा परतीच्या पावसामुळे देखील झेंडूच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते; मात्र तरीही झेंडू फुलाला दसऱ्यापासून चांगला दर मिळत असल्याने दिवाळीत चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शहादा तालुक्यातील ब्राह्राणपुरी येथील शेतकरी रमाकांत पाटील यांनी आपल्या पपई पिकात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची जून-जुलै महिन्यात लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांची तोडणी करून गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे.

परतीच्या पावसाने नुकसान 
परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्याची झळ झेंडू फुलांच्या शेतीला बसल्याने नियमित उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याचा परिणाम दर वधारले आहेत. शहादा बाजारपेठ लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पिवळ्या व भगव्या रंगाच्या झेंडू फुलांनी बहरली होती. 

दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन व वाहनांच्या पूजेसाठी झेंडू फुलांची मागणी वाढते. या दृष्टिकोनातून पपईच्या पिकात आंतरपीक म्हणून झेंडू फुलांची लागवड केली आहे. ही फुले थेट गुजरात राज्यात विक्रीसाठी व्यापारी घेऊन जात असल्याने भाव देखील चांगला मिळतोय. 
- रमाकांत नथू पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी.

Web Title: Latest News Intercrop Cultivation of marigold in papaya crop, experiment of Shahada farmer, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.