Lokmat Agro >शेतशिवार > Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण? 

Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण? 

Latest News jalgaon district faijpur taluka Madhukar Sugar Factory is finally closed, | Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण? 

Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण? 

Agriculture News : गेल्या ४० वर्षांपासून परिसराला सुजलाम् सुफलाम् करणारा मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे.

Agriculture News : गेल्या ४० वर्षांपासून परिसराला सुजलाम् सुफलाम् करणारा मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- वासुदेव सरोदे
जळगाव :
गेल्या ४० वर्षांपासून परिसराला सुजलाम् सुफलाम् करणारा मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश २५ जुलै रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर), छत्रपती संभाजीनगर यांनी काढला आहे. या कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक हे अवसायक असतील. 

२०१९ पासून मागणी करूनही निवडणूक खर्च वेळेत जमा न केल्याने व संस्था पोटनियमांनुसार कार्यरत नसल्याचे कारण देऊन संस्था अवसायनात काढल्याचे या आदेशात नमूद आहे. सन १९७२ पासून अखंडित गाळप करून आर्थिक क्रांती घडवणारी एक मोठी औद्योगिक संस्था बंद होत असल्याने सभासदांमध्ये नाराजी आहे.

मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. आपण येत्या दोन-तीन दिवसात अवसायकपदाचा कार्यभार घेणार आहोत.    -जी. जी. बलसाने, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.
मधुकर कारखाना अवसायनात जाणे ही खेदाची बाब आहे. या आदेशाविरुद्ध सभासदांसोबत शासनाकडे अपील करून दाद मागणार आहोत.
- ललित बोंडे, सभासद,
मधुकर कारखाना हा अवसायनात काढण्याचा घाईघाईत झालेला दुर्दैवी निर्णय आहे. यासंदर्भात पुनर्विचार व्हावा. जिल्ह्यात अनेक संस्था बंद अवस्थेत असताना त्याबाबत निर्णय न होता केवळ मधुकरलाच हा न्याय का?
- शरद महाजन, माजी चेअरमन

Web Title: Latest News jalgaon district faijpur taluka Madhukar Sugar Factory is finally closed,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.