जळगाव : एकीकडे यंदा राज्यभरात पाणीबाणी उभी ठाकली असून पाणी टंचाई वर मात करण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी नागरिकांसह प्रशासनाला देखील योग्य ती पाऊले उचलावी लागतील. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेकडून अनोख्या जलसंवर्धन लघु चित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत जलजीवन मिशनची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी. यासाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्या 23 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धकांनी कॉपीराईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र जिल्हा पाणी स्वच्छता मिशन या विभागाकडे सादर करण्याच्या सूचना जि.प.कडून देण्यात आल्या आहेत. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट लघुपट तयार करणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना जि.प. कडून पारितोषिकदेखील दिले जाणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या विषयांवर लघुपट निर्मिती करता येणार
पाण्याचे शाश्वत स्रोत, पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्ती, जलसंवर्धन, हर घर जल घोषित गाव विकास, जलजीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतिसंगम या विषयावर लघुपट तयार करणे अपेक्षित आहे.
पहिल्या तीन विजेत्यांची होणार निवड
लघुपट ३ ते ५ मिनिटांचा असावा.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३९ हजार, व्दितीय पारितोषिक २१ हजार, तर तृतीय पारितोषिक ११ हजार आहे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारे नसावे,
स्पर्धकाने पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगीत, गीत. चित्रीकरण हे स्वतः तयार केलेले असावे.