Lokmat Agro >शेतशिवार > Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी ज्वारी बियाणे विक्री सुरु, इथं साधा संपर्क 

Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी ज्वारी बियाणे विक्री सुरु, इथं साधा संपर्क 

Latest News Jwari Biyane Sale of Rabi Sorghum seeds started in Mahatma Phule Agricultural University see details | Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी ज्वारी बियाणे विक्री सुरु, इथं साधा संपर्क 

Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी ज्वारी बियाणे विक्री सुरु, इथं साधा संपर्क 

Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून रब्बी ज्वारी बियाणे (Sorghum Seed) विक्री सुरु झाली आहे.

Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून रब्बी ज्वारी बियाणे (Sorghum Seed) विक्री सुरु झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून रब्बी ज्वारी बियाणे (Sorghum Seed) विक्री सुरु झाली आहे. यात फुले रेवती, फुले यशोमती, फुले वसुधा, फुले सुचित्रा हे वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २ सप्टेंबरपासून विक्री सुरु झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (MPKV Rahuri) फुले रेवती फुले वसुधा फुले सुचित्रा फुले रुचिरा फुले यशोमती या ज्वारीच्या वाणांची विक्री सुरू झाली आहे. यात फुले रेवती या वाणाची प्रति किलो 4 किलोची बॅग 240 रुपयांना असून या वाणाच्या 945 बॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर फुले वसुधा या वाणाच्या 1703 बॅग, फुले सुचित्रा या वाणाच्या 515 बॅग, फुले रुचिरा या वाणाच्या 30 बॅग तर फुले यशोमती वाणाच्या 450 बॅग उपलब्ध आहेत.

फुले वसुधा, फुले सुचित्रा आणि फुले यशोमती या वाणाच्या चार किलो बॅगची किंमत 240 रुपये असून फुले रुचिरा या वाणाच्या 04 किलो बॅगची किंमत 360 रुपये आहे.

अ.क्रपिकवाणबियाणाचे प्रकारदर प्रती ब्यॉगविक्रीसाठी उपलब्ध ब्यॉगक्विंटल
1ज्वारीफुले रेवतीसत्यप्रतरु. २४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग९३५ बॅग९३५ बॅग
2ज्वारीफुले वसुधासत्यप्रतरु. २४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग१७०३ बॅग१७०३ बॅग
3ज्वारीफुले सुचित्रासत्यप्रतरु. २ ४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग५१५बॅग५१५बॅग
4ज्वारीफुले रुचिरासत्यप्रतरु. ३६० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग३० बॅग३० बॅग
5ज्वारीफुले यशोमतीसत्यप्रतरु.२४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग४५० बॅग४५० बॅग

त्याबरोबर विद्यापीठात भाजीपाला बियाणे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ते खालीलप्रमाणे.... 

अ.क्रपिकवाणबियाणाचे प्रकारदर प्रती ब्यॉगविक्रीसाठी उपलब्ध ब्यॉगक्विंटल
1गवारफुले गवारसत्यप्रतरु ६० प्रति १०० ग्रॅम पॅकेट१२० पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट )१२० पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट )
2भोपळाफुले सम्राटसत्यप्रतरु. १४५ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
3वांगीफुले अर्जुनसत्यप्रतरु. १४५ /- प्रति १०ग्रॅम पॅकेट९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट )९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट )
4वांगीफुले हरितसत्यप्रतरु २० प्रति १० ग्रॅम पॅकेट१५७ पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट )१५७ पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट )
5मिरचीफुले ज्योतीसत्यप्रतरु १९८ प्रति १०० ग्रॅम पॅकेट१५४ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )१५४ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )
6घोसाळेफुले कोमलसत्यप्रतरु. १२१ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
7कारलेग्रीनगोल्डसत्यप्रतरु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट१५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)१५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
8कारलेहिरकणीसत्यप्रतरु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )

दरम्यान शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी आधार कार्ड आणि सातबारा उतारा ही कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ०२४२६ २४३३४५ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
 

Web Title: Latest News Jwari Biyane Sale of Rabi Sorghum seeds started in Mahatma Phule Agricultural University see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.