Jwari Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून रब्बी ज्वारी बियाणे (Sorghum Seed) विक्री सुरु झाली आहे. यात फुले रेवती, फुले यशोमती, फुले वसुधा, फुले सुचित्रा हे वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २ सप्टेंबरपासून विक्री सुरु झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (MPKV Rahuri) फुले रेवती फुले वसुधा फुले सुचित्रा फुले रुचिरा फुले यशोमती या ज्वारीच्या वाणांची विक्री सुरू झाली आहे. यात फुले रेवती या वाणाची प्रति किलो 4 किलोची बॅग 240 रुपयांना असून या वाणाच्या 945 बॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर फुले वसुधा या वाणाच्या 1703 बॅग, फुले सुचित्रा या वाणाच्या 515 बॅग, फुले रुचिरा या वाणाच्या 30 बॅग तर फुले यशोमती वाणाच्या 450 बॅग उपलब्ध आहेत.
फुले वसुधा, फुले सुचित्रा आणि फुले यशोमती या वाणाच्या चार किलो बॅगची किंमत 240 रुपये असून फुले रुचिरा या वाणाच्या 04 किलो बॅगची किंमत 360 रुपये आहे.
अ.क्र | पिक | वाण | बियाणाचे प्रकार | दर प्रती ब्यॉग | विक्रीसाठी उपलब्ध ब्यॉग | क्विंटल |
---|---|---|---|---|---|---|
1 | ज्वारी | फुले रेवती | सत्यप्रत | रु. २४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग | ९३५ बॅग | ९३५ बॅग |
2 | ज्वारी | फुले वसुधा | सत्यप्रत | रु. २४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग | १७०३ बॅग | १७०३ बॅग |
3 | ज्वारी | फुले सुचित्रा | सत्यप्रत | रु. २ ४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग | ५१५बॅग | ५१५बॅग |
4 | ज्वारी | फुले रुचिरा | सत्यप्रत | रु. ३६० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग | ३० बॅग | ३० बॅग |
5 | ज्वारी | फुले यशोमती | सत्यप्रत | रु.२४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग | ४५० बॅग | ४५० बॅग |
त्याबरोबर विद्यापीठात भाजीपाला बियाणे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ते खालीलप्रमाणे....
अ.क्र | पिक | वाण | बियाणाचे प्रकार | दर प्रती ब्यॉग | विक्रीसाठी उपलब्ध ब्यॉग | क्विंटल |
---|---|---|---|---|---|---|
1 | गवार | फुले गवार | सत्यप्रत | रु ६० प्रति १०० ग्रॅम पॅकेट | १२० पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट ) | १२० पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट ) |
2 | भोपळा | फुले सम्राट | सत्यप्रत | रु. १४५ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट | ९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) | ९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) |
3 | वांगी | फुले अर्जुन | सत्यप्रत | रु. १४५ /- प्रति १०ग्रॅम पॅकेट | ९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट ) | ९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट ) |
4 | वांगी | फुले हरित | सत्यप्रत | रु २० प्रति १० ग्रॅम पॅकेट | १५७ पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट ) | १५७ पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट ) |
5 | मिरची | फुले ज्योती | सत्यप्रत | रु १९८ प्रति १०० ग्रॅम पॅकेट | १५४ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट ) | १५४ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट ) |
6 | घोसाळे | फुले कोमल | सत्यप्रत | रु. १२१ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट | ६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) | ६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) |
7 | कारले | ग्रीनगोल्ड | सत्यप्रत | रु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट | १५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) | १५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट) |
8 | कारले | हिरकणी | सत्यप्रत | रु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट | ३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट ) | ३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट ) |
दरम्यान शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी आधार कार्ड आणि सातबारा उतारा ही कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ०२४२६ २४३३४५ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.