Kaju Anudan : राज्यातील काजू उत्पादक (Kaju Utpadak farmer) शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान (Shasan Anudan) देणे" या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात १ कोटी ६० लाख ९५ हजार ११० रुपये निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे आता काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान (Kaju Anudan) देणे" या योजनेस शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन २०२४ च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बी साठी प्रति किलो १० याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे.
दरम्यान पात्र लाभार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या १०.०० कोटी इतक्या निधी पैकी ३ कोटी ३६ लाख ५२ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. आता पात्र लाभार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी दिलेल्या पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार आणखी १ कोटी ६० लाख ९५ हजार ११० रुपये इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यास मान्यता देण्यात आली आहे.
काय आहे शासन निर्णय
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनं अनुदान देणे" या योजनेसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत व वितरीत अर्थसंकल्पित निधी १० कोटी रुपये असून चालू वर्षी वितरीत निधी ३.३६५२ कोटी रुपये आहे, तसेच आता वित्तरीत करावयाचा निधी १.६०९५११ कोटी रुपये आहे. या शासन निर्णयाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी पात्र काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल.
Namo Shetkari Hafta : नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला, वाचा काय म्हटलंय?